आमदार रवी राणा यांची सुटका; आता मोर्चा मातोश्रीवर - आमदार रवी राणांना जामीन
आमदार रवी राणा यांच्या सुटकेसाठी खासदार नवनीत राणा यांच्यासह युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते राजकमल चौक येथे ठिय्या आंदोलनाला बसले असतानाच रवी राणा यांना जामीन मिळाला असून यांच्या सुटकेची माहिती आली.

अमरावती - अतिवृष्टीमुळे अडचणीत असणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, या मागणीसाठी शुक्रवारी गुरुकुंज मोझरी येथे आंदोलन करणाऱ्या आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. आज न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. आमदार रवी राणा यांच्या सुटकेसाठी खासदार नवनीत राणा यांच्यासह युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते राजकमल चौक येथे ठिय्या आंदोलनावर बसले असतानाच आमदार रवी राणा यांना जामीन मिळाला असून यांच्या सुटकेची माहिती आली. दरम्यान शेतकऱ्यांना न्याय देण्यास अपयशी ठरणाऱ्या सरकारच्या निषेधात युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्यात आला. आता उद्या शेतकऱ्यांसाठी थेट मातोश्रीसमोर आंदोलन करणार, असा इशारा कारागृहातून बाहेर येताच रवी राणा यांनी दिला.