ETV Bharat / state

मेटकर बंधू भागवतात अंजनगाव बारीच्या १० हजार लोकांची तहान - water shortage

विहीर आटल्यामुळे नागरिकांना मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी गावापासून काही अंतरावर शेती करणार्‍या अमरावतीच्या रवींद्र आणि दिलीप मेटकर यांच्याशी संपर्क साधला.

मेटकर बंधू भागवतात अंजनगाव बारीच्या १० हजार लोकांची तहान
author img

By

Published : May 25, 2019, 11:12 AM IST

अमरावती - शहरा लगतच्या १६ किलोमीटरवरील १० हजार लोकसंख्या असलेल्या अंजनगाव बारी गावाला दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. अशात या गावकऱ्यांच्या मदतीला गावापासून काही अंतरावर शेती करणारे रवींद्र मेटकर बंधू धावून आले आहेत. त्यांनी आपल्या शेतातल्या कुंपनलीकेतून पाणी मार्च महिन्यापासूनच गावाला देणे सुरू केले असून ग्रामस्थांची तहान भागविण्याचे काम ते करत आहेत.

अत्यल्प पावसामुळे अमरावती जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी हे गाव त्यातीलच एक आहे. गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी कोंडेश्‍वर तलावाजवळ आणि मेघे इंजीनीअरींग कॉलेजजवळ ग्रामपंचायत प्रशासनाने तयार केलेल्या विंधन विहीर आटल्यामुळे नागरिकांना मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी गावापासून काही अंतरावर शेती करणार्‍या अमरावतीच्या रवींद्र आणि दिलीप मेटकर यांच्याशी संपर्क साधला.

मेटकर बंधू भागवतात अंजनगाव बारीच्या १० हजार लोकांची तहान

त्यांच्या शेतातल्या कुंपनलीकेचे पाणी गावकर्‍यांची तहान भागविण्यासाठी देण्याची विनंती केली. ती मेटकर बंधूंनी मान्य केली. शेतातल्या केळीच्या झाडांना पाणी न देता गावाला पाणी देण्याचे औदार्य त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून दाखवले. या दोन्ही वर्षी त्यांच्या पिकांचे नुकसान झाले. यंदा संपूर्ण गावाला पाणी देण्याचे हे तिसरे वर्ष आहे. महत्तवाचे म्हणजे वीजेचे बिलही मेटकरच दरवर्षी भरतात.

याबद्दल बोलताना रवींद्र मेटकर म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून अंजनगाव बारी गावाला उन्हाळ्यात शेतातल्या विंधन विहीरीवरून पाणी देत आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला असून तृष्णा भागविणे हे पुण्याचे काम असून यंदाही गावाला पाणी दिले आहे. नफा-नुकसानीचा विचार आम्ही करत नाही. पाणी दिल्यावर गावकर्‍यांच्या चेहर्‍यावर जे समाधान झळकते, तेच आमच्यासाठी लाखमोलाचे असल्याची प्रतिक्रिया यावेळी रवींद्र मेटकर यांनी दिली.

Intro:मेटकर बंधू भागवितात १० हजार लोकसंख्या असलेल्या अंजनगाव बारी गावाची तहान

शेतातल्या कुंपनलीकेतून पाणी पुरवठा

पाणी देण्याचे सलग तिसरे वर्ष
-------------------------------------------
अमरावती अँकर

अमरावती शहर लगतच्या 16 किलोमिटरवर असलेल्या दहा हजार लोकसंख्या असलेल्या अंजनगाव बारी गावाला दरवर्षी प्रमाणे यंदाही पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. त्यांच्या मदतीला गावापासून काही अंतरावर शेती करणारे रवींद्र मेटकर बंधू धावून आले आहे. त्यांनी आपल्या शेतातल्या कुंपनलीकेतून मार्च महिन्यापासूनच गावाला पाणी देणे सुरू केले असून ग्रामस्थांनची तहान भागविण्याचे पुण्य त्यांना मिळत आहे.

- अत्यल्प पावसामुळे अमरावती जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी हे त्यातीलच एक गाव आहे. गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी कोंडेश्‍वर तलावाजवळ आणि मेघे इंजीनीअरींग कॉलेजजवळ ग्रामपंचायत प्रशासनाने तयार केलेल्या विंधन विहीर आटल्यामुळे नागरिकांना मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन वर्षापासून ही स्थिती आहे. त्यावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी गावापासून काही अंतरावर शेती करणार्‍या अमरावतीच्या रवींद्र व दिलीप मेटकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या शेतातल्या कुंपनलीकेचे पाणी गावकर्‍यांची तहान भागविण्यासाठी देण्याची विनंती केली. ती मेटकर बंधूंनी मान्य केली. शेतातल्या केळीच्या झाडांना पाणी न देता गावाला पाणी देण्याचे औदार्य त्यांनी पहिल्यावर्षी दाखविले. दूसर्‍या वर्षी सुद्धा तीच स्थिती निर्माण झाली. तेव्हाही त्यांनी पाणी दिले. या दोनही वर्षी त्यांच्या पिकाचे नुकसान झाले. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. महत्वाचे म्हणजे वीजेचे बिलही मेटकर हेच दरवर्षी भरतात यंदा सम्पूर्ण गावाला पाणी देण्याचे तिसरे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षापासून अंजनगाव बारी गावाला उन्हाळ्यात शेतातल्या विंधन विहीरीवरून पाणी देत आहे. सर्व खर्च आम्हीच करतो. मानवतेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला आहे. तृष्णा भागविणे हे पुण्याचे काम असून यंदाही गावाला पाणी दिले आहे. नफा-नुकसानीचा विचार आम्ही करत नाही. पाणी दिल्यावर गावकर्‍यांच्या चेहर्‍यावर जे समाधान झळकले, तेच आमच्यासाठी लाखमोलाचे असल्याची प्रतिक्रिया यावेळी रवींद्र मेटकर यांनी दिली
१५ मार्च पासूनच गावात पाणी टंचाई भासवु लागली होती गावकर्यांनी मेटकरी यांना पाणी देण्याची मागणी केली व त्यांनी ती मान्य केली व आज मेटकर यांनी दिलेल्या पाण्या मुळेच गावाची तहान भागात आहे.

बाईट-रवींद्र मेटकरBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.