ETV Bharat / state

अमरावतीत शहरात कायद्याचा धाक नाही, माजी आमदार राबसाहेब शेखावत यांचा आरोप - अवैध धंदे

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना रावसाहेव शेखावत यांनी शहरात भरदिवसा दोन हत्या होतात, वरली मटका आणि क्रिकेटच्या सट्ट्यामूळे आत्महत्यांच्या, गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत असून आज शहरात कायद्याचा धाक उरला नसल्याचे म्हणाले.

रावसाहेब शेखावत
author img

By

Published : Jul 11, 2019, 11:41 AM IST

अमरावती - शहरात भरदिवसा एका तरुणीची हत्या होते. जुगार, वरली, मटक्यासारखे अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. हा सारा प्रकार पाहता अमरावती शहरात कायद्याचा धाक नाही, असा आरोप माजी आमदार राबसाहेब शेखावत यांनी केला. शहरातील अवैध धंद्यांवर वचक बसावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर प्रयत्न करावेत अशी मागणी करत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

पत्रकारांशी बोलताना रावसाहेब शेखावत

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस अध्यक्ष किशोर बोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा आयोजित केला होता. शहरात भरदिवसा दोन हत्या होतात, वरली मटका आणि क्रिकेटच्या सट्ट्यामूळे आत्महत्यांच्या घटनेत वाढ होत आहे. तसेच पेट्रोल, डिझेल पेक्षा स्थानिक समस्यांवरील प्रश्नांना महत्व देण्याची मागणी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी केली. आज वरिष्ठांच्या आदेशानुसार पेट्रोल, डिझेल दरवाढीचाच विषय होईल असे बोरकर यांचे म्हणणे होते. दरम्यान शहरातील कायदेव्यवस्था ढासळली असल्याने पेट्रोल डिझेलच्या दरवाढी सोबतच पोलिसांच्या अकार्यक्षम भूमिकेबाबतही स्वतंत्र निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, महापालिकेचे विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांच्यासह किशोर बोरकर हे उपस्थित होते.

शहरात वाढलेले अवैध धंदे हेच गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत असून पोलिसांचा शहरात वचकच राहिला नाही. शहरात क्रिकेटचा सट्टा कुठे चालतो याची माहिती पोलिसांना असताना पोलीस आयुक्त नागरिकांना 'सट्टा कुठे चालतो' असे विचारतात, हे गंभीर आहे. अमरावती शहरात कायदा व्यवस्थेचा धाक असावा, अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी आपणच शासनाकडे आमच्या निवेदनाद्वारे कळवावे, अशी मागणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे करण्यात आली.

आजच्या आंदोलनाबाबत पत्रकारांशी बोलताना रावसाहेब शेखावत यांनी अमरावती शहरात कायद्याचा वाचक असावा. सट्टा या सारख्या अवैध धंद्यांना आळा बसायला हवा, अशी मागणी करीत आज शहरात कायद्याचा धाक उरला नसल्याबाबत खंत व्यक्त केली.

Intro:अमरावती शहरात भरदिवसा एक तरुणीची हत्त्या होते, जुगार वारली मटक्यासारखे या अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. हा सारा प्रकार पाहता अमरावती शहरात कायद्याचा धाक नाही असेच दर्शविणारा असल्याचा आरोप माजी आमदार राबसाहेब शेकजवत यांनी केला. शहरातील अवैध धंद्यावर वाचक बसावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर प्रयत्न करावेत अशी मागणीसाठी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

Body:पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस अध्यक्ष किशोर बोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा आयोजित केला होता. शहरात भरदिवसा दोन हत्त्या होतात, वरली मटका आणि क्रिकेट च्या सट्ट्यामूळे आत्महत्यांच्या घटनेत वाढ होत असताना पेट्रोल डिझेल पेक्षा स्थानिक समस्यांवर आंदोलनाला महत्व देण्याची मागणी कंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी केली. आज वरिष्ठांच्या आदेशानुसार पेट्रोल,डिझेल दरवाढीचाच विषय होईल असे बोरकर यांचे म्हणणे होते. दरम्यान शहरातील कायदेव्यवस्था ढासळली असल्याने पेट्रोल डिझेलच्या दर वाढीसोबतच पोलिसांच्या अकार्यक्षम भूमिकेबाबतही स्वतंत्र निवेदन जिल्जाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, महापालिकेचे विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांच्यासह किशोर बोरकर यांनी शहरात वाढलेले अवैध धंदे हेच गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत असून पोलीसांचा वाचकच शहरात राहिला नाही. शहरात क्रिकेटचा सट्टा कुठे चालतो याची माहिती पोलिसांना असताना पोलीस आयुक्त नागरिकांना सट्टा कुठे चालतो असे विचारतात हे गंभीर आहे. अमरावती शहरात कायदा व्यवस्थेचा धाक असावा, अवैध धंदे बंद व्हाबेत यासाठी आपणच शासनाकडे आमच्या निवेदनाद्वारे कळवावे अशी मागणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे करण्यात आली.
आजच्या आंदोलनाबाबत पत्रकारांसजी बोलताना रावसाहेब शेखावत यांनी अमरावती शहरात कायद्याचा वाचक असावा, सट्टा वगैरे अवैध धंद्यांना आळा बसायला हवा अशी मागणी करीत आज शहरात कायद्याचा धाक उतरला नसल्याबाबत खंत व्यक्त केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.