ETV Bharat / state

Amravati Crime News: ढोंगी बाबाने केला विवाहितेवर बलात्कार; आरोपी 24 तासात अटक - Police File FIR and Arrested In Amravati

समाजात आजही काही लोक अंधश्रद्धेमुळे ढोंगी बाबांच्या दरबारात जातात. अमरावती जिल्ह्यात उतारा काढण्यासाठी ढोंगी बाबाकडे गेलेल्या महिलेवर ढोंगी बाबाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Amravati Crime News
विवाहितेवर बलात्कार
author img

By

Published : Jun 8, 2023, 6:44 PM IST

माहिती देताना ठाणेदार संतोष ताले

अमरावती : जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. दर्यापूर तालुक्यातील कुकसा गावात एका ढोंगी बाबाने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, 23 वर्षाच्या विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अवघ्या 24 तासात या ढोंगी बाबाला अटक केली आहे.

असे आहे प्रकरण : दर्यापूर तालुक्यातील कुकसा या गावात गत काही दिवसांपासून, संतोष गजानन बावणे हा भामटा स्वतःला देवाचा अवतार म्हणून अनेकांच्या अंगातील उतारा काढून द्यायचा. पोर्णिमेच्या दिवशी त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या अनेकांची त्याच्या घरी गर्दी राहायची. पीडित महिला आपल्या पतीसोबत गत तीन- चार महिन्यांपासून या महाराजकडे जायची. बुधवारी या भामट्याने तुझा उतारा काढायचा यासाठी गावलागतच्या नदीवर जावे लागेल, असे पीडित महिलेला सांगून तिला तीच्या नवऱ्यासह नदीवर नेले.

दर्यापूर तालुक्यातील कुकसा गावात ढोंगी बाबाने विवाहित महिलेवर बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अवघ्या 24 तासात या ढोंगी बाबाला अटक केली आहे. - ठाणेदार संतोष ताले

ढोंगी बाबाने केला पीडितेवर बलात्कार : नदीच्या काठावर गेल्यावर पूजेची एक वस्तू विसरली आहे, ती आणावी लागेल असे पीडितेच्या नवऱ्याला सांगितले. ती वस्तू आणायला त्याने पिडीतीच्या नवऱ्याला गावात पाठवले. दरम्यान यावेळी नदीकाठी पीडित महिला आणि ढोंगी बाबा हे दोघेच असताना, ढोंगी बाबाने पीडितेवर बलात्कार केला. या प्रकारामुळे हदरलेली पीडित महिला गावाच्या दिशेने पळत सुटली. वाटेत तिला तिचा नवरा भेटला. तिने त्याला झाला प्रकार सांगितल्यावर तो हादरून गेला. यानंतर या दाम्पत्याने दर्यापूर पोलीस ठाणे गाठून झाल्या प्रकाराची तक्रार दिली.

पोलिसांनी भोंदू बाबाला केली अटक : या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेत दर्यापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष ताले यांनी, संतोष बावणे या ढोंगी बाबाला त्याच्या कुकसा येथील घरातून अवघ्या 24 तासात अटक केली. आरोपी ढोंगी बाबाविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तसेच या ढोंगी बाबाची कसून चौकशी करीत असल्याची महिती दर्यापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष ताले यांनी दिली.

हेही वाचा -

  1. Neighbor Married Woman Raped उधारीचे हजार रुपये परत न केल्याने शेजारच्या विवाहितेवर बलात्कार
  2. Rape of a Married Woman अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर नातेवाईकाचा वारंवार बलात्कार
  3. Married woman rape Dharavi धारावीत चाकूच्या धाकावर विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या 2 आरोपींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.