ETV Bharat / technology

ISRO upcoming missions : ISRO करणार अंतराळ पर्यटन सुरू, अंतराळात असणार स्वतःचं स्पेस स्टेशन - ISRO UPCOMING MISSIONS AND PROJECTS

इस्रो त्यांच्या आगामी माहिमेवर काम करत आहे. यात निसार, गगनयान,चांद्रयान,भारतीय अंतराळ स्थानक, अंतराळ पर्यटन मोहिमेचा समावेश आहे. मोहिम

ISRO upcoming missions
प्रातिनिधिक छायाचित्र (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 2, 2025, 3:13 PM IST

हैदराबाद ISRO upcoming missions : इस्रो 2025 मध्ये विविध मोहिमावर काम करणार आहे. प्रगत NVS-02 उपग्रहाचं प्रक्षेपण, व्योमित्र ह्युमनॉइड रोबोटची तैनाती, NISAR पृथ्वी इमेजिंग उपग्रहाचा यात समावेश आहे. तसंच या योजनांमध्ये GSLV, PSLV आणि SSLV प्रक्षेपणांचा समावेश आहे. केंद्रीय अंतराळ मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं की, इस्रोनं 2025 साठी महत्त्वाच्या मोहिमांची तयारी केली आहे. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अर्धा डझनहून अधिक उपग्रहांच प्रक्षेपण होणार आहे. यात अंतराळात महिला मानवीय रोबोट, जगातील सर्वात महागडा भारत-अमेरिका उपग्रह, NISAR प्रक्षेपित होणार आहे.

व्योमित्र मानवीय रोबोट : मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सिंग म्हणाले की, "जानेवारीमध्ये 2025 NVS-02 प्रगत नेव्हिगेशन उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. त्यानंतर मानवरहित गगनयान मोहिमेचा एक भाग म्हणून इस्रोनं विकसित केलेला व्योमित्र हा पहिला मानवीय रोबोट अवकाशात पाठवला जाईल. हे मिशन नंतर नियोजित मानवयुक्त गगनयान मोहिमेचं अग्रदूत म्हणून काम करेल. "व्योमित्र मोहिमेत सर्व काही सुरळीत असल्यास अंतराळवीरांना अंतराळात पाठवले जाईल."

NISAR उपग्रह प्रक्षेपणासाठी तयार : 2025 च्या अपेक्षित मोहिमांपैकी NISAR उपग्रहाचं प्रक्षेपण एक आहे. 12 हजार 505 कोटी रुपयांचा, NISAR हा जगातील सर्वात महाग पृथ्वी इमेजिंग उपग्रह आहे. हा उच्च-रिझोल्यूशन डेटा प्रदान करेल, दर 12 दिवसांनी हा उपग्रह जमीन आणि बर्फ स्कॅन करून जागतिक पर्यावरणीय बदलांवर लक्ष केंद्रित करणार आहे. सिंग यांनी असंही नमूद केलं की इस्रो 2025 च्या पहिल्या तिमाहीत LVM3-M5 मिशनद्वारे मोबाइल संप्रेषणासाठी एक यूएस उपग्रह प्रक्षेपित करेल. हा इस्रोच्या व्यावसायिक अवकाश प्रयत्नांमधील आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे. यामुळं भारताला उपग्रह प्रक्षेपणातून 400 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त महसूल मिळवला आहे.

15 मोहिमा यशस्वीपणे लाँच : इस्रोचं अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले, 2025 मध्ये चार GSLV रॉकेट, तीन PSLV प्रक्षेपण आणि एक SSLV प्रक्षेपण करण्याची योजना आहे. 2024 मध्ये, इस्रोनं 15 मोहिमा यशस्वीपणे लाँच केल्या होत्या. ज्यात आदित्य L1 सोलर मिशन आणि INSAT-3DS मिशन सारख्या उच्च-प्रोफाइल प्रकल्पांचा समावेश होता. स्पेस एक्सप्लोरेशन आणि टेक्नॉलॉजीमध्ये इस्रोनं जागतिक स्थान मजबूत केल्यामुळं आगामी वर्ष आणखी महत्वाचं असेल.

गगनयान मोहिम 2025 लाँचसाठी सज्ज : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहिम आता 2026 पर्यंतच उड्डाण घेण्याची शक्यता आहे. अंतिम मोहिमेपूर्वी, भारतीय अंतराळ एजन्सी ह्युमनॉइड रोबोटसह एक विरहित मोहिम हाती घेईल. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, गगनयान मोहिमेची प्रक्षेपण तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. सध्याची तयारी लक्षात घेता, 2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीलाच प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे, असं ते म्हणाले.

पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहिम : गगनयान मोहिमेला आधीच विलंबांचा सामना करावा लागला आहे. ही भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहिम असेल. तीन दिवसांच्या मोहिमेसाठी 400 किमीच्या निम्न-पृथ्वीच्या कक्षेत तीन सदस्यांना अंतराळात पाठवलं जाईल. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणं ISRO चं उद्दिष्ट आहे. जर भारत मानवाला अवकाशात पाठवण्यात यशस्वी झाला, तर पूर्वीच्या सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि चीननंतर ही कामगिरी करणारा तो जगातील चौथा देश ठरेल.

चांद्रयान-4 रिटर्न मिशन : भारत 2028 मध्ये चांद्रयान-4 रिटर्न मिशन लाँच करण्याची योजना आखत आहे, जपानच्या सहकार्यानं एक विरहित लँडर आणि रोव्हर पाठवण्यात येणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चंद्राचे नमुने गोळा करणे, ते नमुने पृथ्वीवर या मिशनचं उद्दिष्ट आहे. भारत सरकारनं यापूर्वीच या मोहिमेला मान्यता दिली आहे. या चांद्रयान 4 मोहिमेसाठी 21 अब्ज रुपये ($250 दशलक्ष US) निधि देण्यात आला आहे. मिशनच्या आर्किटेक्चरमध्ये इस्रोच्या सर्वात शक्तिशाली रॉकेट, LVM-3 मधून दोन प्रक्षेपणात पाच अंतराळयान मॉड्यूल्सचा समावेश आहे. दोन प्रक्षेपणांपैकी पहिले प्रक्षेपण लँडर आणि नमुना-संकलन वाहनाची वाहतूक असेल, तर दुसरे एक ट्रान्सफर मॉड्यूल आणि रीएंट्री मॉड्यूल असेल, जे चंद्राच्या कक्षेत पार्क केलं जाईल. नंतर गोळा केलेले नमुने घेऊन जाणारा आरोहक चंद्राच्या पृष्ठभागावरून प्रक्षेपित होईल आणि सुरक्षित टचडाउनसाठी पृथ्वीकडे जाणाऱ्या रीएंट्री मॉड्यूलमध्ये नमुने हस्तांतरित करेल.

इस्रो सराव मोहिम सुरू करणार : चांद्रयान-4 मोहिमेसाठी सर्वात आव्हानात्मक कार्य म्हणजे दोन अंतराळयान कक्षेत फिरत असताना डॉकिंग करणे. इस्रोनं स्वदेशी तंत्रज्ञान देखील विकसित करत आहे, जे चंद्र मोहिमेसाठी वापरण्यात येईल. ज्यामध्ये रोबोटिक हात आणि चंद्राच्या पृष्ठभागाच्या काही मीटर खाली नमुने गोळा करण्यासाठी ड्रिलिंग यंत्रणा समाविष्टचा समावेश आहे.

लँडिंगचं ठिकाण अद्याप निश्चित नाही : चांद्रयान-4 मोहिमेसाठी लँडिंग क्षेत्र अद्याप घोषित केलं नाहीय. मागील काही अहवालांनुसार, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील शक्ती पॉईंटजवळ, भारताचं चांद्रयान-3 अंतराळ यान ज्या ठिकाणी उतरलं होतं त्याच ठिकाणी चांद्रयान-4 लॅंडिंग करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा साठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळं शास्त्रज्ञांना दक्षिण ध्रुवाचं आकर्षण आहे. इथं पाणी शोधण्यासाठी खनन केलं जाण्याची शक्यता आहे.

भारत-जपान संयुक्त मोहिम : चांद्रयान 5 मोहिम भारत आणि जपान यांची सयुक्त मोहिम असेल. या मोहिमेला चंद्र ध्रुवीय शोध प्रकल्प किंवा LUPEX म्हणून देखील ओळखलं जातं. इस्रो आणि जपानचा JAXA संयुक्त प्रकल्प असेल, ज्यामध्ये 770-पाऊंड (350 kg) रोव्हरचा समावेश असेल. ल्युपेक्स चांद्रयान-3 वर उड्डाण केलेल्या 60-पाऊंड (27 किलो) प्रज्ञाना रोवरपेक्षा हा डझनभर पटींनी जड असेल. भारत लँडर, मिशन प्लॅनिंग आणि पेलोड प्रदान करेल, तर जपान प्रक्षेपण वाहन, विविध पेलोड आणि रोव्हरचं योगदान देईल.

2035 पर्यंत भारताचं अंतराळात स्वतःचं स्पेस स्टेशन : : चांद्रयानाच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) नं आणखी एका नवीन मोहिमेवर काम सुरू केलं आहे. ज्याचं नाव इंडियन स्पेस स्टेशन आहे. भारतीय अंतराळ स्थानक 2035 पर्यंत पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्याची इस्त्रोची योजना आहे. इस्रोनं स्पेस स्टेशनसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली आहे. दोन ते चार अंतराळवीर भारतीय अंतराळ स्थानकात राहू शकतील असं तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. केवळ रशिया, अमेरिका आणि चीनकडं अंतराळ स्थानक आहे. अंतराळात स्वतःचं स्पेस स्टेशन बनवणारा भारत हा लवकरच चौथा देश बनणार आहे. इस्रोच्या मते, अंतराळ स्थानकाचं वजन सुमारे 20 टन असू शकते. हे घन संरचनांचं बनलेलं असेल, परंतु त्यात फुगवण्यायोग्य मॉड्यूल देखील जोडले जाऊ शकतं. पूर्ण झाल्यानंतर स्पेस स्टेशनचं एकूण वजन सुमारे 400 टनांपर्यंत जाऊ शकतं.

कसं असेल स्पेस स्टेशन ?: भारताच्या पहिल्या अंतराळ स्थानकाच्या एका टोकाला क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या रॉकेटसाठी डॉकिंग पोर्ट असेल. भारत यासाठी 21 व्या शतकातील विशेष डॉकिंग पोर्ट विकसित करत आहे. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या डॉकिंग पोर्टसारखं असू शकतं. एकदा पूर्ण झाल्यानंतर, भारतीय अंतराळ स्थानकामध्ये चार स्वतंत्र मॉड्यूल आणि सौर पॅनेलच्या चार जोड्या असू शकतात. अंतराळ स्थानकामध्ये ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी आणि कार्बन डायऑक्साइड बाहेत टाकण्यासाठी सर्व सुविधा असतील.

स्पेस स्टेशनची गरज : अंतराळ स्थानकावरून विविध ग्रहांवर मोहिमेवर जाणाऱ्या अंतराळवीरांचा डेटा आणि नमुने या केंद्रात पाठवता येणार आहे. त्यानंतर तिथं संशोधन करून वैज्ञानिक परिणाम शोधू शकतील. ज्याचा फायदा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना होईल. आतापर्यंत अंतराळातून पृथ्वीवर डेटा आणि नमुने आणले जातात. त्यानंतर इस्रोच्या प्रयोगशाळेत संशोधन केलं जातं, परंतु अनेकदा काही कारणांमुळं डेटाचे नमुने पृथ्वीवर पोहोचत नाहीत, या सर्व कारणांमुळं स्पेस स्टेशनची गरज भासू लागलीय.

इस्रो 2040 पर्यंत अंतराळवीर चंद्रावर पाठवणार : चांद्रयान-३ चांद्रमोहिमेच्या ऐतिहासिक यशानंतर, इस्रो 2024 पर्यंत प्रथमच भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याची तयारी करत आहे. भारतीय हवाई दलातील चार चाचणी वैमानिकांची अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली आहे, असं इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितलंय. ISRO नं गगनयान कार्यक्रमासह अंतराळ संशोधनात पुढील पाऊल टाकण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. भारतीय अंतराळवीरांना तीन दिवसांपर्यंत लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये ठेवण्याची इस्त्रोची योजना आखली आहे.

बेंगळुरूमध्ये प्रशिक्षण : सध्या, अंतराळवीर बेंगळुरूमधील प्रशिक्षण सुविधा केंद्रात (ATF) प्रशिक्षण घेत आहेत. मानवनिर्मित अंतराळ मोहिम गगनयानमध्ये (मानवांना सुरक्षितपणे वाहतूक करण्यास सक्षम) लॉंच व्हेइकल (HLVM3), क्रू मॉड्यूल (CM) आणि सर्व्हिस मॉड्यूल (SM) आणि लाइफ सपोर्ट सिस्टीम यांचा समावेश असलेल्या ऑर्बिटल मॉड्यूल यांचा समावेश असेल. इंटिग्रेटेड एअरड्रॉप टेस्ट, पॅड ॲबॉर्ट टेस्ट आणि टेस्ट व्हेईकल फ्लाइट्स व्यतिरिक्त दोन एकसारख्या अन-क्रूड मिशन्स (G1 आणि G2) मिशन असतील. सीएम ही एक राहण्यायोग्य जागा आहे, ज्यामध्ये क्रूसाठी पृथ्वीसारखे वातावरण असेल. सुरक्षा उपायांमध्ये आपत्कालीन परिस्थितींसाठी क्रू एस्केप सिस्टम (सीईएस) असेल. या टेस्ट व्हेईकलचं पहिले डेव्हलपमेंट फ्लाइट (टीव्ही-डी1) 21 ऑक्टोबर 2023 रोजी लाँच करण्यात आलं होतं.

ISRO 2030 पर्यंत अंतराळ पर्यटन सुरू करणार : अंतराळात प्रवास करण्याची तुमची सर्व स्वप्न आता लवकरच पूर्ण होण्याची शक्यात आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) नं 2030 पर्यंत प्रति प्रवासी 6 कोटी रुपये खर्चून अंतराळ पर्यटन सुरू करण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. सुरक्षित, टिकाऊ आणि पुन्हा वापरता येण्याजोगे असं स्वतःचं अंतराळ पर्यटन मॉड्यूल तयार करण्यासाठी काम सुरू आहे. पण, या सहलीचा अंदाजे खर्च 6 कोटी रुपये आहे.

हे वाचलंत का :

  1. 16 सूर्योदय आणि सूर्यास्त पाहून सुनिता विल्यम्स यांनी केलं नववर्षाचं स्वागत
  2. 31 डिसेंबरला काळ्या चंद्रासोबत आकाशात दिसणार अनेक ग्रह, जाणून घ्या वेळ आणि तपशील
  3. स्पेडेक्स यशस्वीरित्या प्रक्षेपित, इस्रोनं नवीन वर्षापूर्वीच अवकाशात रचला इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.