नवी दिल्ली Khel Ratna Award :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी दोन कांस्यपदक जिंकणारी नेमबाज मनू भाकर हिला खेलरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याच्यासोबत विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेशलाही खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. मनू भाकरच्या नावाची खेलरत्नसाठी निवड झाली नसल्याच्या बातम्या आधी येत होत्या, पण आता या दिग्गज खेळाडूला देशातील सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार मिळणार आहे. मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल आणि 25 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय आहे.
➡️ @YASMinistry announces #NationalSportsAwards 2024
— PIB India (@PIB_India) January 2, 2025
➡️ President of India to give away Awards on 17th January 2025
➡️ ‘Major Dhyan Chand Khel Ratna Award’ is given for the spectacular and most outstanding performance in the field of sports by a sportsperson over the period of… pic.twitter.com/nRY3nsleOY
डी गुकेशलाही मिळणार खेलरत्न पुरस्कार : बुद्धिबळपटू डी गुकेशलाही खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. गुकेशनं गेल्या महिन्यात 12 डिसेंबर रोजी बुद्धिबळाचा विश्वविजेता होण्याचा मान मिळवला होता. सिंगापूर इथं झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गुकेशनं चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करुन विजेतेपद पटकावलं होतं. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी तो विश्वविजेता बनला, हा एक विश्वविक्रम आहे.
हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांनाही खेलरत्न : हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार यांनाही खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं. तर प्रवीण कुमारनं उंच उडी T64 स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. प्रवीण कुमारनं आशियाई विक्रम मोडीत काढत ही कामगिरी केली होती. यासह क्रीडा मंत्रालय 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करणार आहे, विशेष म्हणजे त्यापैकी 17 खेळाडू पॅरा ॲथलीट आहेत.
Ministry of Youth Affairs and Sports announces the Khel Ratna Award for Olympic double medalist Manu Bhaker, Chess World Champion Gukesh D, Hockey team Captain Harmanpreet Singh, and Paralympic Gold medallist Praveen Kumar. pic.twitter.com/VD54E0EtEk
— ANI (@ANI) January 2, 2025
अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंची यादी :
- ज्योती याराजी - ऍथलेटिक्स
- अनु राणी - ऍथलेटिक्स
- नीतू - बॉक्सिंग
- स्वीटी बुरा - बॉक्सिंग
- वंतिका अग्रवाल - पाठलाग
- सलीमा टेटे - हॉकी
- अभिषेक - हॉकी
- संजय - हॉकी
- जर्मनप्रीत - हॉकी
- सुखजित सिंग - हॉकी
- राकेश कुमार - पॅरा-तिरंदाजी
- प्रीती पाल - पॅरा-ॲथलेटिक्स
- चरित्र दीप्ती -पॅरा-ॲथलेटिक्स
- अजित सिंग - पॅरा-ॲथलेटिक्स
- सचिन सर्जेराव खिलारी - पॅरा-ॲथलेटिक्स
- धरमबीर - पॅरा-ॲथलेटिक्स
- एच होकाटो सेमा - पॅरा-ॲथलेटिक्स
- सिमरन - पॅरा-ॲथलेटिक्स
- नवदीप - पॅरा-ॲथलेटिक्स
- नितेश कुमार - पॅरा-बॅडमिंटन
- टी मुरुगेसन - पॅरा-बॅडमिंटन
- नित्या श्री सुमंती सिवन - पॅरा-बॅडमिंटन
- मनीषा रामदास - पॅरा-बॅडमिंटन
- कपिल परमार - पॅरा-जुडो
- मोना अग्रवाल - पॅरा शूटिंग
- रुबिना फ्रान्सिस - पॅरा नेमबाजी
- स्वप्नील कुसळे - शूटिंग
- सरबज्योत सिंग - शूटिंग
- अभय सिंग - स्क्वॉश
- साजन प्रकाश - पोहणे
- अमन - कुस्ती
हेही वाचा :