अमरावती - अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. आज दुपारी हे वादळ कोकण किनारपट्टीला धडकले. या वादळाचा तडाखा मुंबई, रायगड, ठाणे या ठिकाणी बसला आहे. याच दरम्यान राज्यात सर्व दूर पाऊस सुरू झाला असून अमरावती शहरात आज दुपारपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे.
निसर्गचक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच पावसाचा अंदाज वर्तवला होता. मंगळवारी सायंकाळी देखील अमरावतीत मुसळधार पाऊस कोसळला होता. आज दुपारी पुन्हा जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱयांमुळे काही ठिकाणी पडझड झाली असून मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.