अमरावती - शहरात आज (शनिवारी) सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. दिवाळीत बरसत असल्यामुळे पावसामुळे शहरात जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे. त्यामुळे शहरवासियांची तारांबळ उडाली आहे.
हेही वाचा - कोल्हापुरात मतदान प्रक्रियेला सुरुवात; सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विधानसभा निवडणुकीनंतर शहरात दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे संपूर्ण वातावरण बदलले आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणारी गर्दी पावसामुळे घरातच आहे. तसेच शहरातील लहान-मोठे व्यापारी, हातगाड्यांवर दिवे, पणती, फळे विक्रेत्यांची पावसामुळे चांगलीच गोची झाली आहे. आकाशात सकाळपासूनच काळे ढग दाटून आले होते. त्यात आता मुसळधार पावसाची सुरू झाला. हा थांबण्याची शक्यता कमी असल्याने दिवाळीतील लहान-मोठ्या व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.