ETV Bharat / state

यशोमती ठाकूर यांच्याकडून बोंड अळीने नुकसानग्रस्त शेतशिवारांची पाहणी, सरकारी मदतीचे आश्वासन - बोंड अळीने कपाशीचे नुकसान

अमरावती जिल्ह्यातील कठोरा, गोपाळपूर, पुसदा या गावातील बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतशिवाराची पाहणी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज केली. महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहे. सर्वोतोपरि मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Guardian Minister Yashomati Thakur
पालकमंत्री यशोमती ठाकूर
author img

By

Published : Nov 2, 2020, 4:52 PM IST

Updated : Nov 2, 2020, 4:59 PM IST

अमरावती - परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचा घात केल्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाल्यानंतर आता कापूस उत्पादक शेतकरी सुद्धा संकटात सापडला आहे. मागील पंधरा दिवसांपासून कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीने आक्रमण केल्याने कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या अमरावती जिल्ह्यातील कठोरा, गोपाळपूर, पुसदा या गावातील शेतशिवाराची पाहणी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज केली. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा लावून धरणार असल्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलं.

पालकमंत्री यशोमती ठाकूर प्रतिक्रिया देताना
महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी -यशोमती ठाकूर म्हणाल्या की, सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यानंतर आता कपाशी पीक तरी हाती येईल, अशी सगळ्यांनाच आशा होती. पण बोंडसड व बोंडअळीच्या समस्येमुळे चिंताजनक परिस्थिती उद्भवली आहे. या नुकसानाबाबत सरकारकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह आवश्यक त्या सर्व यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात येईल. महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहे.

आधी सोयाबीनने मारले आता कपाशीचे घात केला -

यावर्षी सुरुवातीला बोगस बियाण्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. त्यानंतर उरले-सुरले सोयाबीन हे खोडकिडी रोगाने व परतीच्या पावसाने खराब झाल्याने शेतकऱ्यांचे लावणीचे पैसेही निघाले नाहीत. आता पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या कपाशी पिकावरही पंधरा दिवसांपासून बोंडअळीने आक्रमण केलंय. झाडावर असलेल्या बोंडापैकी अर्ध्यापेक्षा जास्त बोंडे बोंडअळीने बाधित झाल्याने उत्पन्नात घट झाली आहे.

Last Updated : Nov 2, 2020, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.