ETV Bharat / state

अमरावतीत 'हटके' वरात, नवरदेवाचा 30 रिक्षांच्या ताफ्यासह लग्नमंडपात प्रवेश

नवरदेव स्वतः एक ऑटो चालक आहे. त्यामुळे ऑटो-रिक्षा चालकांच्या काय समस्या आहेत? याची त्याला पुरेपुर जाणीव आहे. त्यामुळे आपल्या लग्नामध्ये ऑटो-रिक्षानेच वरात नेण्याचे त्याने ठरवले. त्यामधून एक दिवसापुरता का होईन ऑटो-रिक्षा चालकांना फायदा होणार होता. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला.

ऑटो-रिक्षाने वरात नेताना नवरदेव
author img

By

Published : Jul 13, 2019, 5:05 PM IST

Updated : Jul 13, 2019, 6:01 PM IST

अमरावती - शहरात एका नवरदेवाने २५-३० ऑटोरिक्षाने आपली वरात काढून लग्नमंडपात प्रवेश केला. दिवसभर पैसे कमवण्यासाठी भटकंती करणाऱ्या ऑटोवाल्यांना दोन पैसे मिळतील याच उद्देशाने त्याने ही वरात काढली. त्यामुळे या अमरावतीत या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

नवरदेवाचा 30 रिक्षांच्या ताफ्यासह लग्नमंडपात प्रवेश

संतोष किरणाके हे अमरावतीमधील सामाजिक कार्यकर्ते आहेत. संतोष स्वतः एक ऑटो चालक आहे. तसेच तो एका ऑटो-रिक्षा युनियनचा अध्यक्ष सुद्धा आहे. त्यामुळे ऑटो-रिक्षा चालकांच्या काय समस्या आहेत? याची त्याला पुरेपुर जाणीव आहे. त्यामुळे आपल्या लग्नामध्ये ऑटो-रिक्षानेच वरात नेण्याचे त्याने ठरवले. त्यामधून एक दिवसापुरता का होईन ऑटो-रिक्षा चालकांना फायदा होणार होता. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला.

संतोषचा विवाह शहरातीलच कांचन धुर्वे या मुलीशी ठरला. प्रत्येक नवरदेव अगदी थाटामाटात लग्नमंडपात प्रवेश करतो. मात्र, संतोषने कुठलाही बडेजावपणा न दाखवता २५-३० ऑटो रिक्षाने वरात नेली. एवढे ऑटो एकावेळी रस्त्यावरून जाणार होते. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होणार होता. त्यासाठी त्याने रितसर पोलिसांची परवानही घेतली. तसेच वाहतुकीचे सर्व नियम पाळत ऑटो-रिक्षाने लग्नमंडपात प्रवेश केला.

नवरदेव सजवलेल्या ऑटोत बसला होता. तर सनई-चौघडा वरातीपुढे वाजत होता. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या मंत्र्याच्या ताफ्यालाही लाजवेल, अशी त्याची वरात दिसत होती. आपला होणारा नवरा ऑटोने वरात घेऊन येईल याची थोडीशीही कल्पना कांचनला नव्हती. मात्र, ऑटोने आलेली वरात बघून ती भारावून गेली.

Intro:स्पेशल स्टोरी

अमरावतीत नवरदेवाची अनोखी वरात, तीस ऑटोरिक्षा घेऊन वरात पोहचली लग्नमंडपाच्या दारात

अमरावती

आपलं लग्न आगळंवेगळं होऊन चर्चेत राहावं यांसाठी अनेक वधू वर वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात.कधी नवरदेव नवरी बग्गी तुन येतात,कधी नवरी घोड्यावर स्वार होऊन येते,कोल्हापूर मध्ये मागे बैलबंडीने नवरीची वरात निघाली तर कुठे नवरी हेलिकॉप्टर मधून थेट लग्न मंडपात आल्याच्या गोष्टी आपण ऐकतो आता मात्र अमरावती तर चक्क 25-30 ऑटो रिक्षा व शंभर हुन अधिक वऱ्हाडी घेऊन नवरा मुलगा आपल्या नवरीच्या मांडवात पोहचला.पाहुया एक रिपोर्ट

हा आहे अमरावती मधील सामाजिक कार्यकर्ता
संतोष किरणाके याचा विवाह अमरावती मधीलच कांचन धुर्वे या मुलीशी थाटामाटात झाला .पण याच लग्नात व शहरात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे नवरदेवाचा 25-30 ऑटो रिक्षा घेऊन मोठ्या रुबाबात लग्नात दाखल झालेला ऑटोचा ताफा. लग्नात नवरदेव नवरी कडे महागड्या गाडीने जातो.परंतु संतोष याने कुठलाही बडेजाव न करता साध्या पद्धतीने आपली वरात ऑटोने नेली .संतोष हा स्वतःहा एक ऑटो चालक असून एका ऑटो युनियचा अध्यक्ष सुद्धा आहे.आपल्या लग्नात एक दिवसा पुरता
का होईना ऑटो चालवणाऱ्या सहकाऱ्यांना मदत होईल हा यामागचा उद्देश होता.

तीस ऑटोचा ताफा शहरातून सकाळी दहा वाजता जाईल म्हटल्यावर रस्त्यावर गर्दी तर होणारच शिवाय ट्रॅफिकही जाम होऊ शकत पण या पठ्यांन नियमनुसार वाहतुक पोलिसांची रीतसर परवानगी घेऊनच आपली वरात शहरातून नेली.

सजवलेला ऑटो त्यात बसलेले नवरदेव महाशय पुढे वाजणारा सनई चौघडा अन् वाहतुकीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या मंत्र्याच्या ताफ्यालाही लाजवेल अशी वरातीत ऑटोची शिस्त वाखाणण्याजोगी होतो.आपला होणारा नवरा ऑटोची वरात घेऊन येईल याची जराही कल्पना नसलेली वधू मात्र हा ताफा पाहून आचर्य चकित झाली होती.

बाईट-नवरदेव संतोष किरणाके

उर्वरित पुटेज वेबमोजोवर

Body:अमरावती

Conclusion:अमरावती
Last Updated : Jul 13, 2019, 6:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.