ETV Bharat / state

अमरावतीमध्ये गळफास घेऊन तरूणीची आत्महत्या; प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय

रिद्धी 12 वीमध्ये शिक्षण घेत होती. तिने रविवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. रिद्धीची आई स्वयंपाक खोलीत स्वयंपाक करत असतानाच मागच्या खोलीत ही घटना घडली.

गळफास घेऊन तरूणीची आत्महत्या
author img

By

Published : Sep 29, 2019, 9:16 PM IST

अमरावती - तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वऱ्हा येथे एका 17 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. ही घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. निलिमा उर्फ रिद्धी श्रीकृष्ण मदनकर असे मृत तरूणीचे नाव आहे.

अमरावतीमध्ये गळफास घेऊन तरूणीची आत्महत्या

हेही वाचा - अतीवृष्टीमुळे अमरावतीत सोयाबीनचे पीक सडण्याच्या मार्गावर

याबाबत अधिक माहिती अशी की, रिद्धी 12 वी मध्ये शिक्षण घेत होती. तिने रविवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. रिद्धीची आई स्वयंपाक खोलीत स्वयंपाक करत असतानाच मागच्या खोलीत ही घटना घडली. रिद्धीने गळफास घेतला त्या ठिकाणी तिचे पाय जमिनीला टेकल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी संशय व्यक्त केला. त्यावेळी पोलिसांना गावातील एका मुलाबरोबर तिचे प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती मिळाली. रिद्धीचा मृतदेह तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र, पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटल्यामुळे तिवसा ग्रामीण रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. तिचे शवविच्छेदन अमरावती रूग्णालयात करण्यात येणार आहे.

हेही वाचा - अमरावतीमध्ये अंबादेवीच्या अभिषेकाने नवरात्रोत्सवाला प्रारंभ...

घटनेची माहिती मिळताच कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी तूर्तास मृत्यूची नोंद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन जाधव करत आहेत.

Intro:
अमरावतीच्या वऱ्हा गावात अल्पवयीन युवतीची आत्महत्या,प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा पोलिसांना
संशय

तिवसा तालुक्यातील वऱ्हा येथील घटना

अमरावती अँकर
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्या अंतर्गत वऱ्हा येथे आज रविवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन १७ वर्षीय युवतीचा संशयास्पद अवस्थेत तिच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत गळफास लावून मृतदेह लटकलेला आढळला
नीलिमा उर्फ रिद्धी श्रीकृष्ण मदनकर वय१७ वर्ष रा.वऱ्हा असे मृतक तरुणीचे नाव असून ती बाराव्या वर्गात कुऱ्हा येथे शिक्षण घेत होती, मुलीचा मृतदेह घरीच दोराने गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत तिच्या आईला दिसला.सदर आत्महत्या ही आई स्वयंपाक खोलीत स्वयंपाक करत असतानाच मागच्या खोलीत घडली.
आत्महत्या केलेल्या, मुलीचे पाय हे जमिनीला टेकेलेले दिसले त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला,तर गावातील एका युवकासोबत तिचे प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली,आज सायंकाळी तिचा मृतदेह तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला होता मात्र तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले नाही,घटनेची माहिती मिळताच कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला,पोलिसांनी तूर्तास मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन जाधव करीत आहे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला होता मात्र तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले नाही

प्रेम प्रकरनातुन हा प्रकार आहे, त्यामुळे मृतक तरुणीचे शवविच्छेदन करून तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर सत्यता कळेल मात्र या संदर्भात अद्याप तक्रार दाखल झाली नाही त्यामुळे खोलावर जाऊन चौकशी करण्यात येईल
-सचिन जाधव, पोलीस निरीक्षक कुऱ्हा
Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.