अमरावती - केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा ग्रामीण भागातही अर्थव्यवस्था बळकट करणारा आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी शेतीविषयक कार्यक्रमांसाठी ३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय सेंद्रीय शेतीवर भर दिला आहे. कृषी विषयक सर्व क्रियांना यात प्राधान्य देण्यात आले असल्याचे मत राज्याचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केले आहे.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना बोंडे म्हणाले, वंचित लोक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला उद्योजक, महिला बचत गटासाठी निधी राखून ठेवला आहे. तसेच मध्यमवर्गीयांना प्राप्तीकरात कपात केली आहे. या अर्थसंकल्पामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था नक्कीच बळकट होईल असा विश्वास डॉ बोंडे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - शादी डॉटकॉमवर महिलेची फसवणूक; अमरावतीच्या महिलेला २६ लाखांचा चुना
हेही वाचा - विद्यार्थ्याने पाच रुपयांमध्ये विकली थाळी, ग्रामीण भागात शिवथाळी सुरू करण्याची मागणी