अमरावती - अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरातील मुख्य वस्तीमध्ये आंबेकर यांच्या निवासस्थानी आयपीएल सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी घरावर छापा टाकला. यावेळी जुाग खेळणे सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आरसीबी आणि मुंबई इंडियन्स संघाच्या सामन्यांच्यावेळी हा जुगार सुरू होता.
या छाप्यानंतर पोलिसांनी २६, २३०/- रू. रोख रक्कम, ४५ हजारांचे ४ मोबाईल्स व १ सोनी कंपनीचा एल सी डी किंमत ५०, ०००/- रू., २ मोटार सायकल किंमत १, ४०, ०००/- व सहित्य असा एकूण २, ५१, २३०/- रू. चा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाईमध्ये २ सट्टेबाजांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपींना पुढील कार्यवाही करीता पो. स्टे. अंजनगाव सुर्जी यांच्याकडे स्वाधीन करण्यात आले आहे.
आरोपी अनुप दिपकराव आंबेकर (वय 30, रा. जैनपुरा) व निलेश हरिवल्लभ पसारी (वय 45, रा. सराफा लाईन)चे रहिवासी आहेत. सदर प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे धागेदोरे आणखी काही दिग्गजांशी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे कारवाईमध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.