ETV Bharat / state

Amravati Building Collapse : इमारत कोसळून 5 जणांच्या मृत्यूचे प्रकरण; मृत व्यवस्थापकाच्या पत्नीची पोलिसांत तक्रार - 5 people died in building collapse

अमरावतीत इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला (5 people died in building collapse ) होता. पतीसह चार मजुरांच्या मृत्यूला लॉजमालक, नूतनीकरण करून ती इमारत राहण्यायोग्य होईल, असे सांगणारा खासगी अभियंता तसेच मनपा प्रशासनातील संबंधित अधिकारी कारणीभूत असल्याची तक्रार शिल्पी परमार यांनी शुक्रवारी कोतवाली पोलिसांत ( manager wife complaint in Police ) नोंदविली.

Amravati Building Collapse
मृत व्यवस्थापकाच्या पत्नीची पोलिसांत तक्रार
author img

By

Published : Nov 5, 2022, 12:24 PM IST

अमरावती : अमरावतीत इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला (5 people died in building collapse ) होता. पतीसह चार मजुरांच्या मृत्यूला लॉजमालक, नूतनीकरण करून ती इमारत राहण्यायोग्य होईल, असे सांगणारा खासगी अभियंता तसेच मनपा प्रशासनातील संबंधित अधिकारी कारणीभूत असल्याची तक्रार शिल्पी परमार यांनी शुक्रवारी कोतवाली पोलिसांत ( manager wife complaint in Police ) नोंदविली. याप्रकरणी यापूर्वी दाखल मूळ एफआयआरमध्येच त्यांचा जबाब नोंदविला जाईल, असे ठाणेदार नीलिमा आरज म्हणाल्या.

चार मजुरांचा मृत्यू : रविवारी प्रभात चौक येथील राजेंद्र लॉजची इमारत पडून व्यवस्थापक रवी परमार यांच्यासह चार मजुरांचा मृत्यू झाला ( Rajendra Lodge building collapsed ) होता. त्या अनुषंगाने शुक्रवारी सायंकाळी रवी परमार यांची पत्नी शिल्पी यांनी ठाणेदार नीलिमा आरज यांची भेट घेतली. राजेंद्र लॉजचे पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम पाडल्यानंतर संपूर्ण ढिगारा राजदीप बॅग हाऊसच्या स्लॅबवर पडून होता. त्या अतिभारामुळे ती इमारत कोसळली, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला. याशिवाय तळमजल्यावरील पाचही दुकाने पाडून टाकण्यात यावीत, अशी नोटीस महापालिकेने दिली असताना अंमलबजावणी झाली की नाही, हे महापालिकेच्या अभियंत्यानी, संबंधितांनी का पाहिले नाही, असा सवाल करून पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची हाराकिरीदेखील तितकीच कारणीभूत असल्याचे परमार म्हणाल्या. ही संपूर्ण इमारत अतिशिकस्त झाली असताना व पाचही दुकाने खाली झाली असताना ती दुकाने महापालिकेने का पाडली नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण? : राजेंद्र लॉजची अतिशिकस्त इमारत कोसळून मलब्याखाली दबल्याने पाच जणांचा मृत्यू (5 people died in building collapse ) झाला. इतर दोघे जण जखमी झाल्याची घटना गेल्या रविवारी दुपारी घडली होती. या प्रकरणी महापालिकेच्या उपअभियंत्याच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री राजदीप बॅग हाऊसच्या दोन मालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.

जीर्ण इमारतींना पाडण्याचे आदेश : प्रभात चौकातील राजेंद्र लॉज या जीर्ण इमारतीला पाडण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. त्यानुसार गत महिन्यात राजेंद्र लॉजचे पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील पाडण्यात आले होते. मात्र, त्या जीर्ण इमारतीत तळमजल्यावर राजदीप एम्पोरियम बॅग हाऊस सुरू होते. तेथे रविवारी दुपारी दुरुस्तीच्या कामादरम्यान अचानक ती जीर्ण इमारत कोसळली. यामध्ये रिजवान शाह शरीफ शाह (२०, रा. उस्माननगर), मोहम्मद आरिफ शेख रहीम (३०, रा. रहेमतनगर), कमर इकबाल अब्दुल रफिक (३६, रा. रहेमतनगर), देवानंद हरिश्चंद वाटकर (४०, रा. महाजनपुरा) व रवी त्रिभूवन परमार (४०, रा. साईनगर) यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात राजेंद्र रामेश्वर कदम (४५) रा. आनंदनगर व एक महिला जखमी झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.