ETV Bharat / state

अनर्थ टळला; तिवसा ग्रामीण रुग्णालयात लागली आग, रुग्णांची उडाली तारांबळ

तिवसा येथील शासकीय ग्रामिण रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागून वीज प्रवाह करणारी तार जळाली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गॅस किटच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले.

Tiwasa Rural Hospital
आग लागल्यानंतर रुग्णांची उडालेली तारांबळ
author img

By

Published : Mar 31, 2020, 10:28 AM IST

अमरावती - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. त्यातच तिवसा येथील शासकीय ग्रामिण रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागून वीज प्रवाह करणारी तार जळाली. रात्री 10:30 वाजता अचानक विजेच्या बोर्डामध्ये स्फोट होऊन रुग्णालयात आगीमुळे धूर पसरला. सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र आगीमुळे काहीवेळ रुग्णांची व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

अनर्थ टळला; तिवसा ग्रामीण रुग्णालयात लागली आग, रुग्णांची उडाली तारांबळ
तिवसा शहरालगत सातरगाव रोडवर हे तिवसा ग्रामीण रुग्णालय आहे. सोमवारी रात्री 10:30 दरम्यान अचानक रुग्णालयात आग लागताच चांगलीच पळापळ झाली. रुग्णालयाच्या बाथरूमजवळ असलेल्या वीज बोर्डात आग लागून स्फोट झाला. रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण विजय माळोदे यांना आग दिसताच त्यांनी आरडाओरडा करत कर्मचाऱ्यांना जागे केले. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गॅस किटच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र काही वेळ सर्वांची चांगलीच पळापळ झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.