ETV Bharat / state

लॉकडाऊनचा फटका..! अमरावतीत भाजीपाला कचऱ्यात, नागरिकांसह शेतकरी हवालदिल - कोथिंबीर

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी सुरु आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी मुभा देण्यात येत आहे. पण, काही शेतकऱ्यांचा भाजीपाला सडत असल्याने तो कचराकुंडीतच टाकावा लागत आहे.

सडलेला भाजीपाला
सडलेला भाजीपाला
author img

By

Published : Mar 28, 2020, 10:49 AM IST

अमरावती - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू आहे. त्यातच अमरावतीकरांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी चार तासांचा वेळ दिला असताना अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला वाया जात आहे. सडणारा भाजीपाला दररोज पन्नासहून अधिक ट्रॅक्टरच्या ट्रॉल्याभरून फेकला जात आहे.

अमरावतीत भाजीपाला जातोय कचऱ्यात

सध्या, शहरात जिल्ह्याच्या विविध भागातून शेतमाल येत आहे. या शेतमालाची खरेदी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच करण्याची मुभा अमरावतीकरांना आहे. संचारबंदीमुळे गल्लीबोळात हातगाडीवर भाजी विकणारे सध्या पोलिसांच्या धास्तीमुळे घरातच आहेत. सकाळी 8 ते 12 या वेळात शहरात आलेला भजीपाला खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत आहेत.

इतवारा बाजार परिसरात भाजीपाल्याची सर्वाधिक विक्री होत असली तरी कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात येणारा भाजीपाला बाजारातच सडत आहे. आज एकूण 20 ट्रॉली गोबी फेकण्यात आली. यासह मेथी, कोथिंबीर, टमाटे ट्रॉलीभरून फेकण्यात येत आहे. एककीकडे सर्वसंन्याना भाजीपाला मिळणे कठीण झाले असताना शेतकऱ्यांना हजारो रुपये किमतीचा भाजीपाला सडल्यामुळे फेकण्यात येतो आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा प्रशासनाने हा भाजीपाला वाया न जाता नागरिकांना कसा मिळेल, याबाबत नियोजन आखण्याची गरज असल्याचे बाजारातील कामगारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - #lockdown : अमरावतीत पकडला 97 जणांना घेऊन राजस्थानात जाणारा कंटेनर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.