ETV Bharat / state

अमरावतीत आटलेल्या तलावात पेटणार निर्माल्य नारळांची होळी

वडाळी तलावात गणपती आणि दुर्गादेवींच्या मूर्तींचे मोठ्या संख्येने विसर्जन केले जाते. यावेळी पूजेच्या साहित्यांसह मोठ्या संख्येने नारळही तलावात शिरवले जातात. यासह अनेकांच्या घरात वर्षभर चालणाऱ्या विविध धार्मिक पूजेतील नारळ तलावात शिरवले जातात.

वडाळी तलाव
author img

By

Published : Mar 20, 2019, 1:18 PM IST

अमरावती - अमरावती शहरलगतचा वडाळी तलाव यावर्षी आटण्याच्या मार्गावर आहे. आटलेल्या तलावातून परिसरातील युवकांनी दीड ते दोन हजाराच्या आसपास विसर्जित केलेले नारळ जमा केले आहे. या नारळांची होळी आज करण्यात येणार असल्याचे युवकांनी सांगितले.

वडाळी तलाव

वडाळी तलावात गणपती आणि दुर्गादेवींच्या मूर्तींचे मोठ्या संख्येने विसर्जन केले जाते. यावेळी पूजेच्या साहित्यांसह मोठ्या संख्येने नारळही तलावात शिरवले जातात. यासह अनेकांच्या घरात वर्षभर चालणाऱ्या विविध धार्मिक पूजेतील नारळ तलावात शिरवले जातात. गत वर्षी हवा तसा पाऊस पडला नसल्याने पहिल्यांदा वडाळी तलाव ओव्हर फ्लो झाला नाही. मार्च महिन्यातच अर्ध्यापेक्षा अधिक तलावातील पाणी आटले आहे. तलावाच्या पात्रात चिखल आणि प्लास्टिकच्या पिशव्या प्रचंड प्रमाणात आहे.

या परिसरातील काही युवकांनी तलावाच्या काठचा परिसर स्वछ करायचे ठरविले. मात्र, हे काम सोपे नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पाणी आटलेल्या भागातून देवांच्या मूर्ती आणि नारळ बाहेर काढले. अवघ्या २ तासात दहा ते पंधरा युवकांनी दिड ते दोन हजार नारळ बाहेर काढलेत. तलावाच्या परिसरात गत अनेक वर्षांपासून होळी पेटविण्याची परंपरा आहे. यावर्षी तलावातून काढलेले सगळे नारळ या होळीत पेटविण्याचा निर्णय युवकांनी घेतला आहे.
वडाळी परिसरातील विहिरींना वडाळी तलावातून येणारे पाण्याचे झरे हे मुख्य स्रोत असून यावर्षी मे महिन्यात तलाव पूर्णतः आटण्याची दाट शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी आतापासूनच तलावातील गाळ, कचरा काढून तलाव स्वच्छ करावा अशी मागणी परिसरातील युवकांनी केली आहे.

Intro:अमरावती शहरलगतचा वडाळी तलाव यावर्षी आटण्याच्या मार्गावर आहे. आटलेल्या तलावातुन परिसरातील युवकांनी दिड ते दोन हजाराच्या आसपास शिरवलेले नारळ जमा केले असून या नारळांची होळी आज केली जाणार आहे.

Body:वडाळी तलावात गणपती आणि दुर्गादेवींच्या मूर्त्यांचे मोठ्या संख्येने विसर्जन केले जाते. यावेळी पूजेच्या साहित्यांसह मोठया संख्येने नारळही तलावात शिरवल्या जातात. यासह अनेकांच्या घरात वर्षभर चालणाऱ्या विविध धार्मिक पूजेतील नारळ तलावात शिरवल्या जातात. गत वर्षी हवा तसा पाऊस पडला नसल्याने पहिल्यांदा वडाळी तलाव ओव्हर फ्लो झाला नाही. मार्च महितातच आर्ध्यपेक्षा अधिक तलावातील पाणी आटले आहे. तलावयाच्या पत्रात चिखल आणि प्लास्टिकच्या पिशव्या प्रचंड प्रमाणात आहे. या परिसरातील काही युवकांनी तलावाच्या काठचा परिसर स्वछ करायचे ठरविले. मात्र हे काम सोपे नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पाणी आटलेल्या भागातून देवांच्या मुर्त्या आणि नारळ बाहेर काढले. अवघ्या दोन तासात दहा ते पंधरा युवकांनी दिड ते दोन हजार नारळ बाहेर काढलेत. तलावाच्या पृसरात गत अनेक वर्षांपासून होळी पेटविण्याची परंपरा आहे. यावर्षी तलावातून काढलेले सगळे नारळ या होळीत पेटविण्याचा निर्णय युवकांनी घेतला आहे.
वडाळी परिसरातील विहिरींना वडाळी तलावातून येणारे पाण्याचे झरे हे मुख्य स्रोत असून यावर्षी मे महिन्यात तलाव पुर्णतः आटण्याची दात शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी आतापासूनच तलावातील गाळ, कचरा काढून तलाव स्वच्छ करावा अशी मागणी परिसरातील युवकांनी केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.