ETV Bharat / state

मेळघाटात आढळला संभाव्य कोरोनाबाधित रुग्ण; अमरावतीच्या रुग्णालयात केले दाखल

सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात अद्याप पर्यंत एकही संभाव्य कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. मात्र, चिखलदरा तालुक्यात टेब्रूसोडा गावालगत असणाऱ्या रुईफाटा या गावातील एका युवकामध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आले आहे

corona suspected patient found in melghat
मेळघाटात आढळला संभाव्य कोरोनाबाधित रुग्ण; अमरावतीच्या रुग्णालयात केले दाखल
author img

By

Published : Apr 8, 2020, 2:31 PM IST

अमरावती- मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या रुईफाटा गावात एक संभाव्य कोरोना रुग्ण आढळून आला आहे. या व्यक्तीला अमरावती येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी तो अहमदाबाद येथून गावी परतला असल्याची माहिती आहे.

अमरावती जिल्ह्यात कोरोनामुळे एका व्यक्तीच्या मृत्यू झाला असून एका संभाव्य कोरोनाबाधित मृत व्यक्तीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तीन व्यक्ती हे कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात अद्याप पर्यंत एकही संभाव्य कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. मात्र, चिखलदरा तालुक्यात टेब्रूसोडा गावालगत असणाऱ्या रुईफाटा या गावातील एका युवकामध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आदळून आले आहे. हा युवक कामानिमित्त बरेच दिवस अहमदाबाद येथे गेला होता. नुकताच तो गावात परतला होता. मंगळवारी आरोग्य विभागाच्या पथकाने त्याची प्राथमिक चाचणी करून त्याला थेट अमरावती येथील कोविड रुग्णालयात दाखल केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.