अमरावती- जिल्ह्यात कोरोनाचाचा वाढता प्रादुर्भाव कायम असून तीन चिमुकल्यांनाही कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरावतीमधील कोरोनाबाधितांची संख्या गुरुवारी 76 वर पोचली आहे.
ताज नगर परिसरातील 5 वर्षाच्या मुलगा, 10 आणि 13 वर्षांच्या मुलींसह 35 वर्षांचा पुरुष आणि 30 वर्षांची महिला आणि आझाद कॉलनी येथील 30 वर्षाच्या पुरुषाला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या 24 तासात कोरोनाचा एकही रुग्ण वाढला नसल्याने गुरुवारी अमरावती शहरात नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. शहरात केवळ औषधे दुकाने सुरू असताना लोक घराबाहेर कशासाठी पडतात, हे कोडेच आहे.