ETV Bharat / state

बाल संरक्षक कक्षाने रोखला १४ वर्षीय बालिकेचा बाल विवाह

माहितीच्या आधारावर चाइल्डलाइनचे शंकर वाघमारे व बाल सरंक्षण कक्ष समुपदेशक आकाश बरवट व भूषण कावरे यांनी पथ्रोटचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांच्याशी संपर्क साधला आणि पोलीस निरीक्षक आर. वसुकार यांच्या पथकासोबत टवलार गाव गाठले. त्याठिकाणी पथकाने 14 वर्षीय बालिकेचा होणार विवाह सोहळा रोखला.

बालविवाह रोखला
बालविवाह रोखला
author img

By

Published : May 4, 2021, 3:53 PM IST

अमरावती - अचलपूर तालुक्यातील टवलार गावात १४ वर्षीय बलिकेचा विवाह बुलडाणा जिल्ह्यातील 21 वर्षीय व्यक्ती सोबत होत होता. मात्र चाइल्डलाइन व बाल सरंक्षण कक्षाने दाखवलेल्या तत्परतेमुळे हा विवाह टळला आहे.

टवलार येथे बालविवाह होत असल्याबाबत माहिती चाइल्डलाइन क्रमांक 1098ला प्राप्त झाली होती. ही माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अतुल भडांगे, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी अजय डबले व बाल सरंक्षण अधिकारी भूषण कावरे यांना देण्यात आली. माहितीच्या आधारावर चाइल्डलाइनचे शंकर वाघमारे व बाल सरंक्षण कक्ष समुपदेशक आकाश बरवट व भूषण कावरे यांनी पथ्रोटचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांच्याशी संपर्क साधला आणि पोलीस निरीक्षक आर. वसुकार यांच्या पथकासोबत टवलार गाव गाठले. त्याठिकाणी पथकाने 14 वर्षीय बालिकेचा होणार विवाह सोहळा रोखला.

अल्पवयीन मुलीचे बालगृहात संगोपन

टावलार गावात मुलीच्या आई वडिलांना घेवून ग्राम बाळ सरंक्षण समितीची बैठक घेण्यात आली. सदर ठिकाणी सर्वांची बैठक घेऊन बालविवाह अधिनियम 2006नुसार मुलीचे वय १८ वर्ष होईपर्यंत लग्न करणार नाही, असे हमीपत्र ग्राम बाल सरंक्षण समिती व मुलीच्या आई वडील यांच्या समक्ष भरून घेण्यात आले. मुलीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने मुलीला १८ वर्ष होईपर्यंत मुलीचे संगोपन बालगृहात करता येईल, असे सांगण्यात आले. सदर कार्यवाही करीत असताना अंगणवाडी सेविका, सरपंच, पोलीस पाटील, आशासेविका, मुख्याध्यापक तसेच गावातील सदस्य उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.