अमरावती - राज्यात सध्या भाजपाच्या चार नवीन केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. आज मुंबईतही भाजपाचे नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसरा लाटेचा धोका पाहता या यात्रेतून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो अशी टीका शिवसेनेसह, राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जाते. दरम्यान महाविकास आघाडीतील पक्ष्यांच्या या टीकेला भाजपा नेते तथा माजी मंत्री संजय कुटे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेने जर कोरोना वाढत असले तर मग वरून सरदेसाईंच्या युवासेनेच्या संवाद यात्रेने कोरोना वाढणार नाही का असा सवाल आमदार संजय कुटे यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले नेते संजय कुटे -
पहिल्या वेळेस महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात केंद्रात प्रतिनिधित्व मिळालं आहे. त्यामध्ये आदिवासी असेल मराठा असेल सर्व सर्वांना प्रतिनिधीत्व केंद्र शासनाने मोदींच्या नेतृत्व मध्ये दिलं आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या मंत्र्यांकडून महाराष्ट्रासाठी आपल्याला यात्रेच्या माध्यमातून आणि विकासाला चालना देणे यासाठी आवश्यकता आहे. त्यासाठी ही जनआशीर्वाद यात्रा असल्याचं कुटे म्हणाले. युवा सेनेचे मोठं मोठे मेळावे घेऊन सरदेसाई फिरत आहेत. तुमचे मोठे कार्यक्रम होत आहेत. काँग्रेसचे कार्यक्रम होत आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्यक्रम घेत आहे. त्यामुळे भाजपाच्या या यात्रेवर टीका करन योग्य नाही असा कुटे म्हणाले. जर यात्रेने कोरोना वाढत असेल तर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा मेळावा बंद करून त्यांच्यापासून सुरूवात केली पाहिजे असं कुटे म्हणाले.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे आराध्य दैवत आहेत -
सर्वांचे महाराष्ट्र व देशामध्ये आमचे कार्यकर्ते स्वर्गीय बाळासाहेब यांच्या विचारांनी चालणारे आहे. जर काहीजण विसरले असतील तर तो त्यांचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेचा सुर आहे तो अतिशय लांच्छनास्पद महाराष्ट्रसाठी आहे अशी टीका त्यांनी केली.
भाजपला फायदा होण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा नाही -
नवीन चार मंत्र्यामार्फत काढण्यात येणारी जनआशीर्वाद यात्रा ही भाजपच्या फायद्यासाठी नाही. तर या मंत्राच्या विभागांतर्गत जे काही काम येतात ते लोकांना सांगण्यासाठी तसेच लोकांच्या काही अपेक्षा असतील त्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी ही जन आशीर्वाद असल्याचं स्पष्टीकरण आमदार संजय कुटे यांनी दिलं.
भाजपा प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा ही फक्त मीडियात -
भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा ही फक्त मीडियाच्या माध्यमातून झाली आहे. भाजपामध्ये प्रदेशाध्यक्ष हा मीडियाच्या माध्यमातून बदलल्या जात नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये रितसर सर्व होत असतं. भाजपा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा सध्या कुठे नसल्याच्या वक्तव्य भाजप नेते संजय कुटे यांनी केलं.