अमरावती - वर्धा नदीत मंगळवारी (दि. 14 सप्टेंबर) अकरा जणांचा बुडून दुर्दैवी अंत झाला. ही घटना अतिशय गंभीर असून या घटनेत दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत शासनाने जाहीर करावी, अशी मागणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी (दि. 15 सप्टेंबर) जिल्हा प्रशासनाला पत्र दिले.
डॉ. मुंडे यांनी केला पालकमंत्र्यांचा निषेध
वर्धा नदीत अकरा जणांचा बुडून मृत्यू झाला असताना जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन त्वरित घटनास्थळी पोहोचायला हवे होते. मात्र, या घटनेची साधी दखलही पालकमंत्र्यांनी घेतल नाही, असा आरोप करत अनिल बोंडे यांनी निषेध नोंदवला.
मुख्यमंत्र्यांवर ओढले ताशेरे
मुंबईत एखादी साधी घटना घडली तरी त्याचा गाजावाजा केला जातो. आमच्या विदर्भात अकरा जणांचे प्राण गेले मात्र त्याचे गांभीर्य मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांना नाही. मुख्यमंत्री असंवेदनशील असल्याचा आरोप करत बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले. नदीत बुडालेल्या काही जणांच्या कुटुंबीयांना शासनाकडून दहा लाख रुपयांची मदत मिळावी, असे निवेदन डॉ. बोंडे यांनी निवासी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांना सादर केले.
हेही वाचा - वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले; तिघांचे मृतदेह सापडले