अमरावती - मोर्शी -वरुड विधानसभा मतदारसंघात राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा 9 हजार 500 मतांनी दारुण पराभव झाला आहे. युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांनी मोर्शी मतदारसंघात बाजी मारली आहे.
हेही वाचा - अमरावती विधानसभा : बडनेरातून रवी राणा विजयी, तर कृषीमंत्री अनिल बोंडेंचा पराभव
कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा हा झालेला पराभव धक्कादायक मानला जात आहे. बोंडे हे मोर्शीतून उभे होते. त्यांची ही चौथी टर्म होती. लागोपाठ तीनवेळा निवडून आलेले बोंडे चौथ्यांदाही मोठ्या फरकाने निवडून येतील असं बोलले जात होते. मात्र, मतदारांनी बोंडे यांना नाकारल्याने भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.