ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : अमरावती विभागातील भारत जोडो यात्रेला वाशीम येथून सुरुवात

राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) सध्या हिंगोली जिल्ह्यात आहे. तर मंगळवार १५ नोव्हेंबर पासून अमरावती विभागातील भारत जोडो यात्रेला वाशीम येथून सुरवात ( Bharat Jodo Yatra starts from Washim ) होणार आहे.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra
author img

By

Published : Nov 14, 2022, 6:06 PM IST

अमरावती : काँग्रेस युवा नेते राहुल गांधी ( Congress youth leader Rahul Gandhi ) यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व अशी ‘भारत जोडो’ पदयात्रा ( Bharat Jodo Yatra ) सद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. गेल्या ७ नोव्हेंबर पासून नांदेडच्या देगलूर येथून प्रारंभ झालेली भारत जोडो यात्रा ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) सद्या आठव्या दिवशी हिंगोलीत दाखल झाली आहे. तर मंगळवार १५ नोव्हेंबर पासून अमरावती विभागातील भारत जोडो यात्रेला वाशीम येथून सुरवात ( Bharat Jodo Yatra in Amravati Division ) होणार आहे.

आ. खोडके यांच्या नेतृत्वात हजारो समर्थक रवाना - अमरावतीच्या आ. सुलभाताई खोडके यांच्यावर अमरावती विभागातील भारत जोडो यात्रेची विशेष जबाबदारी आहे. आजपासून आ. सुलभाताई खोडके यांचे हजारो समर्थक वाशीमला रवाना झाले आहे आहेत. काँग्रेसचे युवा नेता राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेला महाराष्ट्रात अभूतपूर्व असा प्रतिसाद ( Response to Bharat Jodo Yatra in Maharashtra ) मिळत आहे. सकाळपासूनच त्यांच्या पदयात्रेला महिला ,पुरुष ,युवा वर्ग तसेच सर्वसमावेशक जनतेचा उदंड सहभाग लाभत आहे. वारकरी बांधव त्याच बरोबर विद्यार्थी वर्ग सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजर असून "जात -पात ते बंधन तोडो ,भारत जोडो -भारत जोडो असा नारा दिला जात आहे.

१५ नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा अमरावती विभागात - महाराष्ट्रात नांदेडच्या देगलूर , नायगाव , भोकर , कळमनुरी , हिंगोली असा प्रवास करत आता नवव्या दिवशी मंगळवार १५ नोव्हेंबर ला भारत जोडो यात्रा अमरावती विभागात दाखल होणार आहे. अमरावती विभागातील वाशीम येथून दुपारी ३.३० वाजता राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होईल. राहुल गांधी यांचे स्वागत तसेच भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी अमरावतीच्या काँग्रेस आ.सुलभाताई खोडके या आपल्या हजारो समर्थकांसह वाशीममध्ये दाखल झाल्या आहेत.

यात्रेला नागरिकांचा प्रतिसाद - अमरावती विभागात पाचही जिल्ह्यांना मिळून राहुल गांधी यांची पदयात्रा १५ ते १६ नोव्हेंबर दरम्यान वाशिम जिल्हा दोन दिवस , १७ ते १८ नोव्हेंबर दरम्यान अकोला येथे दोन दिवस, १९ ते २० नोव्हेंबर दरम्यान बुलढाण्यातून ही यात्रा जाणार आहे. दरम्यान शेगाव येथे राहुलजी गांधी यांची एक जाहीर सभा देखील होणार आहे. काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांची ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद - प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अशोकराव चव्हाण, जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात भारत जोडो यात्रेचे आयोजन झाले असून महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद दिसून आली. आता अमरावती विभागातील भारत जोडो यात्रेला घेऊन अमरावतीवर मोठी जबाबदारी असल्याने वरिष्ठ नेत्यांनी आ. सुलभाताई खोडके यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्ते , समर्थक व सर्वसामान्य जनता तसेच धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्या नागरिकांनी भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार महोदयांनी केले आहे. तसेच अमरावती विभागात राहुल गांधी यांच्या १५ ते २० नोव्हेंबर पर्यंतच्या भारत जोडो यात्रेत आ. सुलभाताई खोडके यांचा सहभाग राहणार आहे.

याबाबत खोडके यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण देश एकवटला असून महाराष्ट्रात याला उदंड असा प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने भारत जोडो यात्रेला घेऊन उत्तम अशी तयारी व नियोजन केल्याने आज सर्व समावेशक जनता यात सहभागी झाली. भारत जोडो पदयात्रेमध्ये देशाच्या एकता, अखंडता, धर्मनिरपेक्षतेचे दर्शन घडत आहे. सर्वत्र राहुल गांधी यांचे वारे वाहू लागले आहे. महाराष्ट्र राज्यात विविध भागात झालेल्या भारत जोडो यात्रेत काँग्रेसची ताकद दिसून आली असून आता अमरावती विभागातील पदयात्रा निश्चितच ऐतिहासिक ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.