अमरावती: आता प्रचाराने चांगलाच जोर पकडला आहे. अशातच काल वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर आणि भाजपाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ चंद्रशेखर बावनकुळे अमरावती येथे गेले. त्याच्या काही तासानंतर पदवीधर मतदारसंघासाठी उभे असलेल्या उमेदवारावर हा जीवघेणा हल्ला झाला आहे. मतदानासाठी अवघे सात दिवस उरले असताना अशा प्रकारच्या घटनेने निवडणुकीला गालबोट लागले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गवाले यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर धडक देत घटनेचा निषेध केला आहे.
नातेवाईकांची माहुली रुग्णालयावर धडक : विकेश गवाले यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती त्यांच्या नाटकांना मिळतात त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. विकेश गवाले हे अमरावती येथील खासगी बँकेत नोकरीला आहेत. रहाटगाव येथील वृंदावन अपार्टमेंट येथे वास्तव्यास आहे. अमरावती पदवीधर निवडणुकीमध्ये ते अपक्ष उमेदवार असून आज (सोमवारी) सकाळी ९ वाजताच्या दरम्यान आपले चारचाकीने ते मोर्शी येथे प्रचारासाठी जात असताना त्यांना माहुली जहांगीर पुढे रेल्वे पुलाजवळ चार अज्ञात इसमांनी हात दाखवून वाहन थांबविले. यानंतर पाठिंबा देण्यावरून वाद निर्माण झाल्यावर त्यातील एकाने गवाले यांना मारहाण करायला सुरुवात केली. गवाले यांनी तातडीने वाहन सुरू करून माहुलीच्या दिशेने वाहन वळवले. माहुलीच्या बस स्टँडवर येताच त्यांनी नागरिकांना घटनाक्रम सांगितला आणि नागरिकांनी लगेच त्यांना माहुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
नातेवाईकांची पोलिसांकडे तक्रार : यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता असे कळले की, जखमी विकेश गवाले यांच्यावर माहुली जहागीर येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती माहुली जहांगीर पोलिसांना देण्यात आली. मात्र, पोलिस तासभर घटनास्थळी तसेच रुग्णालयात पोहोचले नसल्याने नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली.
हेही वाचा: Shyam Manav security increased : तुमचा दाभोळकर करू.. धमकीनंतर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ