अमरावती - माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी सात वर्षानंतर आज मुंबईच्या टिळक भवन येथे काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. प्रवेश करताच अमरावती डॉ. सुनील देशमुख समर्थकांसह काँग्रेस कार्यकर्त्यानी जल्लोष केला.
इर्विन चौकात फटाक्यांची आतषबाजी -
राजकमल चौक येथे काँग्रेस कार्यकर्त्यानी जल्लोष केल्यावर इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी ढोल ताशेही वाजविण्यात आले. आम्ही पन्नाशी पार केलेल्या कार्यकर्त्यांना डॉ. सुनील देशमुख यांच्या सोबत आता पुन्हा काँग्रेस पक्षात काम करायची संधी मिळणार आहे. आम्ही आता अखेरपर्यंत काँग्रेस पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया यावेळी डॉ. सुनील देशमुख समर्थकांनी दिली.
कार्यकर्त्यानी फटाक्यांचा कचरा केला साफ -
डॉ. सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशनिमित्त फटाक्यांची आतषबाजी केल्याने इर्विन चौकात झालेला कचरा साफ करण्यासाठी माजी महमपौर अशोक डोंगरे यांच्यासह कार्यकर्त्यानी हातात खराटा घेतला. अवघ्या काही मिनिटात कार्यकर्त्यानी चौकात झालेला फटाक्यांचा कचरा झाडून कचरा पेटीत टाकला.