ETV Bharat / state

financial fraud: जावयाने लावला सासऱ्याला लावला १.५० कोटींचा चुना

आयटी कंपनी उभारण्याच्या नावावर पुणे स्थित जावयाने अमरावतीकर सासऱ्याला तब्बल १ कोटी ४८ लाख रुपयांना चुना लावला. जावयाने आता पत्नीपासून घटस्फोट देखील घेतला. मे २०१५ पासून फसवणुकीची ही मालिका अगदी आतापर्यंत सुरू होती. या प्रकरणात आता सासऱ्याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी जावई विक्रम अनिल दुबे (रा. महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

financial fraud
financial fraud
author img

By

Published : Mar 15, 2023, 9:32 PM IST

अमरावती : कठोरा मार्गावर असणाऱ्या हॉलिवूड कॉलनी येथील ६५ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला दोन मुली असून, त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न विक्रम दुबे याच्याशी झाले होते. दरम्यान, आपणास आयटी कंपनी स्थापन करायचा मानस त्याने अमरावतीकर सासऱ्यांकडे व्यक्त केला. तुम्ही पम या कंपनीच्या संचालक असाल, असा शब्द त्याने दिला. त्यासाठी जावई विक्रमने सासऱ्यांकडे मोठ्या रकमेची मागणी केली.

एफडी तोडून जावयाला एक लाख रुपये दिले : गुंतवणुकीचा परतावा आपण वाटून घेऊ, अशी बतावणी त्याने केली. दरम्यान विक्रम दुबे याने 1 जुलै 2015 रोजी कंपनीची नोंदणी केली. मात्र नोंदणी दस्तावेजात सासऱ्याचे नाव कुठेही समाविष्ट केले नाही. दरम्यान ती आयटी कंपनी अमरावतीत उभारू, त्यासाठी 130 एकर जमीन अमरावती एमआयडीसीमध्ये बघा, अशी विनंती केली. सासऱ्यांना त्याने विश्वासात घेतले. मे 2015 मध्ये तक्रारकर्त्या सासऱ्यांनी एफडी तोडून जावयाला एक लाख रुपये दिले, तर पगारातूनदेखील १४ हजार ५०० रुपये दिले.

स्वत:च्या खात्यात वळती केले : ते निवृत्त झाल्यानंतर आरोपीने त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधून 11 लाख 85 हजार रुपये स्वत:च्या खात्यात वळती केले. त्यानंतर वेळोवेळी आरोपीने सासऱ्याच्या खात्यातून 5 लाख, 2.22 लाख, 28.35 लाख, 68.28 लाख व 16 लाख 60 हजार असे एकूण 1 कोटी 48 लाख 53 हजार 696 रुपये स्वत:च्या खात्यात ट्रान्सफर करवून घेतले.

जावई आणि मुलीचा झाला घटस्फोट : आरोपी जावयाने सासऱ्याच्या पुणे व अमरावती येथील एकूण तीन बँक खात्यातून ती रक्कम ट्रान्सफर केली. मात्र, कंपनी उभारण्यासाठी टाळाटाळ चालविली. त्यामुळे फिर्यादी वृद्धाने आपल्या मुलीकडे त्याबाबत विचारणा केली. मुलीनेदेखील पतीला बाबा कंपनीबाबत विचारत आहेत, कंपनी होत नसेल तर बाबांची रक्कम परत करा, असे आरोपी विक्रमला बजावले. त्यामुळे त्या दाम्पत्यामध्ये टोकाचा वाद झाला. परिणामी दोघांमध्ये घटस्फोटदेखील झाला.

पोलीस जाणार पुण्याला : सासऱ्याची फसवणूक करणाऱ्या विक्रम दुबेला अटक करण्यासठी एक पथक पुम्याला रवाना केले जाणार अशी माहिती गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Deepak Sawant Joins Shiv Sena : शिंदे सेना जोमात, उद्धव सेना कोमात; दीपक सावंतांनी घेतले धणुष्यबाण हाती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.