अमरावती - परिवहन महामंडळाची बस गुरूवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून नाल्यात अडकली होती. याबाबत जिल्हा प्रशासनाला रात्री 8 वाजता महीती मिळाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. बसमध्ये 25 ते 30 प्रवासी अडकले होते. त्यांना रात्री 11.30 वाजता सुखरुप बसच्या बाहेर काढण्यात आले. ही घटना मोर्शी तालुक्यातील शिरखेड या गावी घडली.
हेही वाचा - अमरावतीच्या मोर्शीत विघ्नहर्त्यावरही महापुराचं विघ्न....
बुधवारी मोर्शी आणि परिसरात मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला. नळदयंती नदीचा पूर अद्यापही कायम असून लगतचे नालेही पाण्याने तुडूंब भरुन वाहत आहेत. गुरुवारी सायंकाळी 6 च्या सुमारास मोर्शी ते शिरखेड ही लाडकी मार्गे निघालेली बस काशी नदीच्या पुरामुळे देवगिरी नाल्यात वाहत असणाऱ्या पाण्यात अडकली. याबाबत मुकुंद देशमुख या व्यक्तीने रात्री 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कात्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांना माहिती दिली. यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची महीती मिळताच राज्य परिवहन महामंडळचे अधिकारीही शिरखेडकडे निघाले. तत्पूर्वी शिरखेड येथील ग्रामस्थांना घटनेची सुचना दिल्ली असता ग्रामस्थही बसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी धाऊन आले आहेत.
हेही वाचा - तोतलाडोह धरणात ४३ टक्के पाणीसाठा; नागपुरकरांवरचे जलसंकट टळले - चंद्रशेखर बावनकुळे
घटनेची माहिती मिळताच मुळशीचे तहसीलदार, शिरखेड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. बचाव पथकाने बसमध्ये अडकलेल्या 30 प्रवाशांना सुखरूप बस बाहेर काढून बोटीद्वारे त्यांना पाण्यातून बाहेर आणले. बचाव पथकामध्ये गणेश बोरकर, गुलाब पाटणकर ,विजय धुर्वे, हिरालाल पटेल ,प्रवीण आखरे, कैलास ठाकरे, देवानंद भुजाडे, हेमंत सरकटे, संदीप देवकते, उदय मोरे, महेश मांदळे, प्रफुल्ल भुसारी, अजय असोले, कौस्तुभ वैद्य, अमोल हिवराळे, राजेंद्र शहाकार, दीपक डोळस, वसीम पठान, आणि उदय गौर यांचा समावेश होता.
हेही वाचा - कृषीमंत्री अनिल बोंडे आणि पूरग्रस्त ग्रामस्थांमध्ये खडाजंगी