ETV Bharat / state

अमरावतीत पारा 45 अंशाच्यावर जाण्याची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज

राजस्थान, मध्य प्रदेश या दिशेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे अमरावतीसह विदर्भातील तापमान वाढणार आहे.

उन्हात प्रवास करणारे वाहनधारक
author img

By

Published : May 18, 2019, 10:48 AM IST

अमरावती - मे महिन्याच्या सुरुवातीला देशातील काही भागात पाऊस झाला. मात्र, राजस्थान, मध्य प्रदेश या दिशेकडून उष्ण वारे वाहणार आहे. परिणामी जिल्ह्यासह विदर्भातील तापमान वाढणार आहे. 19 ते 25 मे पर्यंत पारा वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भासह राज्यातील अनेक भागात उद्यापासून तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमरावतीकरासह विदर्भातील जनतेला उष्णतेच्या लाटेचा मोठा सामना करावा लागेल, असा अंदाज अमरावती येथील शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात उद्यापासून कमाल तापमानात वाढ होणारअसून 25 मे पर्यंत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान पोहचण्याचा अंदाज आहे. याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यात तापमान हे 47 अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत उसळत्या लाटांचा अनुभव पाहता या दिवसांत सूर्य तळपत असतो. त्यामुळे 19 ते 21 मे या तीन दिवसांत सूर्य आग ओकणार आहे. म्हणून अमरावतीकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहे.

Intro:उद्यापासून अमरावतीसह विदर्भात उष्णतेची लाट .
तापमानात होणार वाढ

अमरावतीत पारा 45 अंशाच्या वर जाण्याची शक्यता
-----------------------------------------------
अमरावती अँकर
-------------------------------
मे महिन्याच्या सुरुवातीला देशातील काही भागात पाऊस झाला मात्र राजस्थान मध्य प्रदेश दिशेकडून उष्ण वारे वाहणार आहे .परिणामी जिल्ह्यासह विदर्भातील तापमान वाढणार आहे. 19 ते 25 मे पर्यंत पारा वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भासह राज्यातील अनेक भागात उद्यापासून तापमानात वाढ होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा अमरावती करासह विदर्भातील जनतेला उष्णतेच्या लाटेचा मोठा सामना करावा लागण्याचा अंदाज अमरावती येथील शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे ..राज्यातील अनेक जिल्ह्यात उद्यापासून कमाल तापमानात वाढ होणार असून 25 मे पर्यंत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे .या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान पोहचण्याचा अंदाज आहे. याच वेळी चंद्रपूर जिल्ह्यात तापमान हे 47 त्यांच्यापर्यंत पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही .आतापर्यंत उसळत्या लाटांचा अनुभव पाहता या वेळी सूर्य तळपत असतो त्यावेळी अमरावतीकरांनी सूर्याची चटक्या पासून सुटका होत नाही .त्यामुळे 19 ते 25 मे पर्यंत अमरावतीतही पार चढणार नाही यामध्ये शंका आणि त्यातही 19 ते 21 मे या तीन दिवसात सूर्य आग ओकणार आहे .Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.