ETV Bharat / state

Amravati crime : कॉलेजमधून केले अपहरण; बळजबरीने कोर्ट मॅरेज

author img

By

Published : Jan 2, 2023, 9:00 AM IST

तू माझ्याशी लग्न केले नाही, तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी देऊन एका कॉलेजकन्येला पळवून नेण्यात आले. (Young girl Abducted) कॉलेजमधून अपहरण करून तिच्याशी कोर्ट मॅरेज करण्यात आले. ( Forced for court marriage ) हा धक्कादायक प्रकार शहर कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ( Amravati crime ) उघड झाला. ( Young girl Abducted ) याप्रकरणी पीडित कॉलेजकन्येच्या तक्रारीवरून आरोपी पवन बाळू अनभोरे वय २४, राहणार सांगळूद, तालुका दर्यापूर याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( City Kotwali Police Station )

Young girl Abducted
कॉलेजमधून केले अपहरण

अमरावती : तक्रारीनुसार, २२ वर्षीय तरुणी शहराच्या मध्यवस्तीतील एका कॉलेजची विद्यार्थिनी आहे, तर आरोपी पवन हा तिचा नातेवाईक असून, सुमारे चार महिन्यांपासून ते परस्परांना ओळखू लागले. दोघांमध्ये संवाद वाढला. सोशल मीडियावर ते व्यक्त होऊ लागले. मुलगी आपल्यावर प्रेम करते, ती लग्न करण्यासही तयार आहे, असा एकतर्फी विचार करून आरोपी पवनने १० नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास तिचे कॉलेज गाठले. ( Amravati crime ) जबरदस्तीने दुचाकीवर बसवून तो तिला जिल्हाधिकारी कार्यालय स्थित विवाह नोंदणी उपनिबंधक कार्यालयात घेऊन गेला. त्याने तेथे बळजबरीने दोघांच्या विवाहाची आगाऊ नोंदणी केली. ही बाब तिने भीतीपोटी कोणालाही सांगितली नाही. मात्र, ती कुढत राहिली. सांगावे तर कसे, असा प्रश्न तिच्यासमोर उभा ठाकला. ( Young girl Abducted from college )

महिन्याभरानंतर केला नोंदणी विवाह : २२ डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास ती कॉलेजवरून घरी परत जात असताना आरोपी त्याच्या दुचाकीने आला. तुला माझ्या सोबत कोर्ट मॅरेज करावेच लागेल, नाहीतर मी माझ्या जिवाचे बरेवाईट करेन, तुला खोट्या गुन्ह्यात फसवेन, असे म्हणून तो तिला जबरदस्तीने त्याच्या दुचाकीवर बसवून कलेक्टर ऑफिस येथील विवाह नोंदणी कार्यालयात घेऊन गेला. ती घाबरल्याने तिने आरडाओरडा केला नाही. त्याने तेथे तिच्याशी जबरदस्ती नोंदणी विवाह केला. मात्र, तो विवाह तिला मान्य नसल्याने तिने मनाचा हिय्या करत ३१ डिसेंबर रोजी शहर कोतवाली पोलिस ठाणे गाठले. तिची आपबिती ऐकल्यानंतर पोलिसांनी रात्री ९ च्या सुमारास गुन्हा दाखल केला. पीडिताने गाडगेनगर पोलिसांत दिलेला तक्रार अर्ज व बयानावरून आरोपीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला. आरोपीने बळजबरीने नोंदणी विवाह केल्याचे पिडिताचे म्हणणे आहे. ( case of kidnapping registered )

तेलंगना तरुणीचे अपहरण : राजन्ना सिरसिल्ला तेलंगाना राज्यातीली जिल्ह्यात चंदुर्थी मंडळातील तरुणीच्या अपहरणाने खळबळ उडाली आहे. पहाटे कारमधून आलेल्या काही लोकांनी तरुणीच्या वडिलांना धक्काबुक्की करून तिला बळजबरीने उचलून नेले. मास्क घातलेले काही लोक पहाटे मूडापल्ली गावातील गोळी शालिनी यांच्या घरी स्विफ्ट कारमधून आले. शालिनी बाहेर आली आणि गाडीत घेऊन जात असताना तिच्या वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. अपहरणकर्त्यांनी वडिलांना ढकलून शालिनीला बळजबरीनेगाडीत बसवले. तरुणीच्या कुटुंबीयांना त्याच गावातील कातुकुरी जॉनवर संशय आहे. तरुणीला घरातून नेत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली दृश्ये आणि गाडीच्या क्रमांकाच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.