अमरावती - वीज कापू नका अन्यथा आम्ही पुन्हा जोडणी करू, अशा इशारा आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री तथा चांदूर रेल्वे नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन गवळी यांनी शासनाला दिला आहे. तसेच वेळ पडल्यास वीज तोडणी प्रकरणी मुख्यमंत्री निवासाबाहेर आम आदमी पार्टीतर्फे राज्य संयोजक रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात आंदोलनासाठी तयार ही राहणार असल्याचे नितीन गवळी यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात लॉकडाउनमुळे जनतेचा रोजगार हिरावला गेला होता. मुख्यत्वे घरगुती आणि लघु उद्योजक ग्राहकांना या लॉकडाउनचा फटका बसला असल्याने त्यांची वीज बिल थकबाकी आहे. त्यांच्या खिशात पैसे नसतांना त्याची वीज कापणे म्हणजे सावकारीच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभ्यास करूनच ३० टक्के वीज सवलतीचे आश्वासन वचननाम्याद्वारे राज्यातील जनतेला दिले होते. मग आता शब्द न पाळता कनेक्शन कट करण्याची धमकी दिली जात आहे. यामागे कुणाचा दबाव आहे हे त्यांनी जनतेस सांगावे. सरकारने कोरोना संकट काळात जनतेच्या पाठीशी उभे न राहता एप्रिलमध्ये वीज दरवाढ केली. पण जनतेच्या दबावामुळे ऊर्जामंत्री यांनी दिवाळीच्या तोंडावर सवलतीची घोषणा केली आणि नंतर घुमजाव केले. त्यांनाही शब्द फिरवावा लागला. यामागे कोणत्या शक्ती आहेत हे त्यांनी जनतेला सांगावे, असे आम आदमी पार्टीने म्हटले आहे.
वीज कापू नका अन्यथा आम्ही पुन्हा जोडणी करू - नितीन गवळी
वीज कापू नका अन्यथा आम्ही पुन्हा जोडणी करू, अशा इशारा आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री तथा चांदूर रेल्वे नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन गवळी यांनी शासनाला दिला आहे.