ETV Bharat / state

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची होणार 'वहीतुला' - अमरावती बातम्या

मोर्शी वरूड आणि शेंदुरजनाघाट येथील भाजप युवा आघाडीने बोंडे यांची वहीतुला करण्याचा संकल्प केला आहे.

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे
author img

By

Published : Jun 22, 2019, 5:23 PM IST

अमरावती - राज्याचे नवनियुक्त कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच अमरावती जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या निमित्त मोर्शी वरूड आणि शेंदुरजनाघाट येथील भाजप युवा आघाडीने बोंडे यांची 'वहीतुला' करण्याचा संकल्प केला आहे. या दौर्‍यात ठिकठिकाणी बोंडे यांचे स्वागत करण्यासाठी मतदारसंघांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, चाहते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

यावेळी स्वागतासाठी येणाऱ्यांनी लिखाण वही, बॉन्डबुक, पुस्तके असे कोणतेही शालेयपयोगी साहित्य सोबत आणावे. त्या साहित्याचा वहीतुलेमध्ये समावेश करण्यात येईल. बोंडे यांची वहीतुला करून हे साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल, अशी माहिती भाजपच्या युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्याने पत्रकाद्वारे दिली. या माध्यमातून जमा होणार्‍या वही-पुस्तकांची तुला करून बोंडे यांचा एक आगळा वेगळा सत्कार करण्यात येईल. या माध्यमातून जमा होणारे सर्व साहित्य गोर-गरीब गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

Intro:कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांची होणार वहीतुला .

अमरावती अँकर

राज्याचे नवनियुक्त कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे हे मंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथमच अमरावती जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहे. या निमित्त मोर्शी वरूड आणि शेंदुरजनाघाट येथील भाजपा युवा आघाडीने डॉ अनिल बोंडे यांची वहीतुला करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या दौर्‍यात ठिकठिकाणी डॉ अनिल बोंडे यांचे स्वागत करीता मतदारसंघांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, चाहतावर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यावेळी स्वागताकरीता येणार्यानी लिखाण वही, बॉन्डबुक, पुस्तके असे कोणतेही शालेयपयोगी साहित्य सोबत आणावे. त्या साहित्याचा वहीतुलेमध्ये समावेश करण्यात येईल.असे युवा आघाडीने कळविले आहे. डॉ अनिल बोंडे यांची वहितूला करून हे साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल असे भाजपाच्या युवा आघाडीच्या पदाधिकारीकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. या माध्यमातून जमा होणार्‍या वही पुस्तकांची तुला करून डॉ अनिल बोंडे यांचा एक आगळा वेगळा सत्कार करण्यात येईल. या माध्यमातून जमा होणारे सर्व साहित्य गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.