ETV Bharat / state

वऱ्हाडी भाषेचा नावलौकिक वाढविण्याची गरज - संमेलनाध्यक्ष पोहरे - sahitya sammelan

संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, वऱ्हाडी कॅटवॉक, वऱ्हाडी रॅम्प, जोगवा यांच्यासह अनेक कार्यक्रम घेण्यात आले.

दुसरे वऱ्हाडी साहित्य संमेलन
author img

By

Published : Jun 2, 2019, 6:28 PM IST

अकोला - वऱ्हाडी भाषेला मोठा इतिहास आहे. ही भाषा अभिजात असून तिचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या भाषेला जागतिक स्तरावर नेण्याची जबाबदारी साहित्यिक, कवी यांची नव्हे तर सामान्य माणसाची आहे, असे प्रतिपादन वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी केले. ते अकोल्यात दुसऱ्या वऱ्हाडी साहित्य संमेलनात आज (२ जून रविवार) बोलत होते.

दुसरे वऱ्हाडी साहित्य संमेलन

दोन दिवसीय संमेलनात विविध पुस्तकांचे प्रकाशन, साहित्याकांची भाषणे ऐकण्यासाठी साहित्यिकांनी गर्दी केली होती. सकाळी मराठा मंडळ सभागृहात संमेलनाला ग्रंथदिंडी काढून सुरुवात झाली. संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, वऱ्हाडी कॅटवॉक, वऱ्हाडी रॅम्प, जोगवा यांच्यासह अनेक कार्यक्रम घेण्यात आले.

अखिल भारतीय मराठी साहित्य मंचतर्फे आयोजित दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख, जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे हे होते. तर स्वागताध्यक्ष दुबईतील मसालाकिंग डॉ. धनंजय दातार, संमेलनाचे उद्घाटन लोककवी विठ्ठल वाघ यांच्या हस्ते झाले.

यासोबतच मराठी चित्रपट कलाकार भारत गणेशपुरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, डॉ. रणजित सपकाळ, डॉ. श्रीकांत तिडके, ज्येष्ठ कादंबरीकार दिनकर दाभाडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्या डॉ. मोना चिमोटे, ज्येष्ठ पत्रकार संदीप भारंबे हे मंचावर उपस्थित होते.

Intro:अकोला - वऱ्हाडी भाषेला मोठा इतिहास आहे. ही भाषा अभिजात असून तिचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या भाषेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी साहित्यिक, कवी यांचीच जबाबदारी नव्हे तर सामान्य माणसाची ही जबाबदारी आहे, असे प्रतिसादन संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी केले. ते वऱ्हाडी दुसरे साहित्य संमेलनाला आज बोलत होते. दोन दिवसीय संमेलनात विविध पुस्तकांचे प्रकाशन, साहित्याकांच्या भाषणाची मेजवानी मिळविण्यासाठी साहितत्यिकांची मांदियाळी झाली आहे. मराठा मंडळ सभागृहात या संमेलनाला सकाळी ग्रँथदिंडी काढून याला सुरुवात झाली.

Body:अखिल भारतीय मराठी साहित्य मंचतर्फे आयोजित दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, स्वागताध्यक्ष दुबईतील मसलाकिंग डॉ. धनंजय दातार, संमेलनाचे उद्घाटन लोककवी विठ्ठल वाघ यांच्या हस्ते झाले. यासोबतच मराठी चित्रपट कलाकार भारत गणेशपुरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, डॉ. रणजित सपकाळ, डॉ. श्रीकांत तिडके, ज्येष्ठ कादंबरिकार दिनकर दाभाडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्य डॉ. मोना चिमोटे, ज्येष्ठ पत्रकार संदीप भारंबे हे मंचावर उपस्थित होते.
या संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, वऱ्हाडी कॅटवॉक, वऱ्हाडी रॅम्प, जोगवा यांच्यासह अनेक कार्यक्रम घेण्यात आले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.