अकोला - संपूर्ण जिल्ह्यात अवैध जंगल तोड व लाकडांची विना परवाना तस्करी वाढली आहे. वनविभागाने व्याळा व एमआयडीसी येथील बिके चौकात लाकूड वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. यात साडेचार लाख रुपयांचे लाकूड पोलिसांनी जप्त केले.
वाचा- अजित पवारांनी सिल्व्हर ओकमध्ये शरद पवारांची घेतली भेट ; चर्चा गुलदस्त्यात
जंगलातील झाडे कापून लाकडाची तस्करी करण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे. अकोला प्रादेशिक विभागाच्या पथकाने अकोला तालुक्यातील विविध भागात कारवाई केली. यामध्ये बाळापूर तालुक्यातील दोन ट्रॅक्टर पकडले. यात अंदाजे 4 लाख 50 हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये व्याळा पेट्रोल पंपजवळ (एम.एच. 38 बी.2870) हा ट्रॅक्टर पकडला. तर अकोला एम.आय.डी.सी. स्थित बिके चौक भागात (एम.एच.30 जे 6531) हा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला. या दोन्हीमध्ये अवैध लाकुड आढळले आहेत.
ही कारवाई अकोला वन विभागाचे उपवनसंरक्षक विजय माने, ए.सी.एफ. सुरेश वाडोदे, आर.एफ.ओ. राजसिह ओवे, वनपाल प्रकाश गीते, वनरक्षक राजेश बिरकड, म्हातारमारे, वाहनचालक अनिल चौधरी यांनी केली. सद्यस्थितीत जप्त करण्यात आलेली दोन्ही ट्रॅक्टर सिंधी कॅम्प स्थित अकोला वनविभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आलेली आहेत. पुढील तपास वनविभाग करीत आहे. या कारवाई संदर्भात अकोला वनविभागाचे वनपाल प्रकाश गीते यांनी माहिती दिली.