अकोला- हिवरखेड येथील बगाडा नाल्याला पूर आल्यामुळे केळी घेऊन जाणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉली पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ड्रायव्हर आणि मजूरही होते. सुदैवाने 13 जण वेळीच पाण्यातून पोहून कसेबसे बाहेर निघाल्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे.
पुराच्या पाण्यात रात्रीच्या वेळी केळीचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली वाहून गेल्या. रात्रीची वेळ असल्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉलीचा शोध लावण्यात अडचणी येत होत्या. अखेर ट्रोली झाडाला अडकलेल्या आढळल्या. ट्रॅक्टर ट्रोलीमध्ये असलेले केळीचे दोनशे कॅरेट तसेच इतर काही सामान पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
गावातील नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टरचा शोध घेण्यात आला. दोन ट्रॅक्टर ट्रॉली शराफत अली आणि फाजील खान यांच्या मालकीची आहेत. तर केळी रामदास निंबोकार या शेतकऱ्याचे आहेत. दरम्यान, या दोन्ही ट्रॉली आणि ट्रॅक्टर बाहेर काढण्याचे काम सकाळपासून सूरु करण्यात आले.