अकोला - अकोल्यात आज सकाळी प्राप्त तपासणी अहवालात दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. आज 54 जणांना तपासणी अहवाल प्राप्त झाला असून 52 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नुकतीच प्रसूती झालेली एक महिला रुग्ण आहे. या बाळाची लवकरच कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्ण दोन्ही महिला असून एक खैर मोहम्मद प्लॉट येथील 50 वर्षीय महिला तर दुसरी खंगारपुरा येथील 26 वर्षीय आहे. खंगारपुरा येथील 26 वर्षीय महिलेची दोन दुवसांपूर्वी प्रसुती झाली आहे. त्यामुळे बाळाचीही कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, बाळाकडे आरोग्य अधिकारी व कर्मचारी विशेष लक्ष ठेवत त्याच्या मातेचा उपचार करत आहेत.
आज प्राप्त अहवाल - 54
पॉझिटिव्ह - 2
निगेटिव्ह - 52
आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 139
मृत - 12
डिस्चार्ज - 14
उपचार सुरु असलेले पॉझिटिव्ह रुग्ण - 113
हेही वाचा - अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 137 वर