ETV Bharat / state

नवीन हेल्मेट घेताय तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात - हेल्मेट न्यूज अकोला

हेल्मेट घेताना ते कसे असावे, कोणत्या कंपनीचे घ्यावे, त्याचे वजन कीती असावे, त्याची मजबुती कशी असावी आणि ते चालवताना आपल्याला सुखकारक राहील का, या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे हेल्मेट घेताना या सर्व गोष्टींचा विचार करूनच हेल्मेट घ्यावे, असे काही मानक आहेत.

Think about everything when buying a new helmet
नवीन हेल्मेट घेताय तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात
author img

By

Published : Jul 19, 2020, 6:29 PM IST

Updated : Jul 24, 2020, 1:43 PM IST

अकोला - देशभरामध्ये दुचाकी चालवताना हेल्मेट आवश्यक असल्याचा नियम आहे. जर आपल्या डोक्यावर दुचाकी चालवताना हेल्मेट नसेल तर शहर वाहतूक शाखा किंवा प्रादेशिक परिवहन विभाग हे आपल्याला दंड आकारतात. ही कारवाई जरी छोटी असली तरी मात्र सरकार आपल्या जीवाची काळजी घेण्याचा संदेश देत आहे. पण हेल्मेट कसे असावे, कोणत्या कंपनीचे घ्यावे, त्याचे वजन कीती असावे, त्याची मजबुती कशी असावी आणि ते चालवताना आपल्याला सुखकारक राहील का या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळे हेल्मेट घेताना या सर्व गोष्टींचा विचार करूनच हेल्मेट घ्यावे, असे काही मानक आहेत.

Think about everything when buying a new helmet
नवीन हेल्मेट घेताय तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात
दुचाकी चालकाचा अपघात झाल्यास त्याच्या डोक्यावरून जर वाहन गेले तर त्याचा जागीच मृत्यू होतो. किंबहुना त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला तर त्याला डोक्याचे कायमस्वरूपी अपंगत्व येते. त्यामुळे बऱ्याच वेळा असा अपघात पाहिल्यास आपण हा विचार करतो किंवा चर्चा करतो की या वाहनचालकाच्या डोक्यात हेल्मेट असते तर हा वाचला असता. सरकारही वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा, असा प्रचार प्रसार करते. त्यासोबतच दुचाकी चालकाच्या डोक्यात जर हेल्मेट नसेल तर त्याच्यावर कारवाईही करते. त्यामुळे हेल्मेट घेताना आपण काळजी घ्यावी हा एक फार मोठा प्रश्न समोर असतो.

अनेकजण रस्त्यावर विकणाऱ्यांकडून हेल्मेट घेतात. पण ते हेल्मेट खरंच सुरक्षीत आहेत का? असा प्रश्न आपल्याला सतावत असतो. एखादा दुचाकीचालक हा हेल्मेट सुशोभित, सौंदर्यीकरण असलेला, वेगवेगळे नकाशे, वेगवेगळी डिझाईन असलेले हेल्मेट घालतो. असे हेल्मेट खरंच मजबूत आहे का हा प्रश्नही त्या निमित्ताने उपस्थित होतो. हेल्मेट घेताना आवश्यक ती काळजी कशी घ्यावी यावरही काही नियम व अटी आहेत. त्या नियमानुसारच त्यासाठी नुसारच हेल्मेट घेणे गरजेचे आहे, असे हेल्मेट विक्रेता तथा हेल्मेट तज्ञ हेमंत गुप्ता यांनी सांगितले.

हेमंत गुप्ता, हेल्मेट विक्रेता

हेल्मेट घेताना या गोष्टी कराव्या
हेल्मेट घेताना ते आयएसआय मार्कच असावे, त्यामुळे डोक्याची सुरक्षाही सर्वात जास्त असते. हेल्मेटचे वजन एक किलो 200 ग्राम पेक्षा जास्त नसावे. तसेच सातशे ग्राम पेक्षा कमी नसावे. बीएसआयच्या अनुसार हेल्मेटचे वजन एवढेच असावे, असा नियम आहे. यापेक्षा जास्त वजन असल्यास आपल्याला मानेचा आजारही होऊ शकतो.

हेल्मेटचे बक्कल लॉक हे उत्तम असावे. हेल्मेट घेताना हे लॉक जोरदार तनानूण बघावे. जर ते लॉक ऊघडले नाही तर हेल्मेट हे सुरक्षित आहे, असे समजावे. जर ते उघडले व त्याची शिलाई उसवली तर हेल्मेट हे चांगल्या प्रतीचे नसल्याचे सिद्ध करते. हेल्मेटवर वायझर हे फायबरचे असावे. फायबरचे वायझर हे आपण त्यावर उभा राहिलो तरी ते तुटणार नाही असे असते. काच किंवा प्लास्टिक फायबर असेल तर ते धोकादायक आहे. हे लवकर खराब होते.

हेल्मेटच्या आत असलेले थर्माकोलची लेअर चांगल्या प्रतिची असावी. हे थर्माकोल आपण दाबून जर बघितले तर त्यामध्ये छिद्र पडेल किंवा छिद्रासारखे त्यामध्ये होत असेल तर ते हे हेल्मेट सुरक्षित नसल्याचे सिद्ध करते. हेल्मेटच्या आतमधील थर्माकोल हे मजबूत असावे असेच हेल्मेटचा नेहमी घ्यावे.

हेल्मेटचे प्रकार......हाफ हेल्मेट, ओपन फेस हेल्मेट, फुल फेस हेल्मेट, मॉड्यूलर ओर फ्लिप हेल्मेट, मोटॉक्रॉस हेल्मेट असे हेल्मेटचे पाच आहेत. यामध्ये फुल फेस हेल्मेट हे सर्वात उत्तम आहे. यामुळे चेहरा पूर्णपणे झाकला जातो. समोरून येणारी हवा ही आपल्या चेहऱ्यावर लागत नाही. त्यामुळे हे हेल्मेट वाहन चालक सर्वात जास्त पसंत करतात. हेल्मेटमध्ये व्हेंटिलेशन असते. हे व्हेंटिलेशन समोर असावे. जर वाहन चालवताना समोरून जोरदार हवा येत असेल तर ती हवा आपल्या चेहऱ्यावर लागत नाही. त्या व्हेंटिलेशनमधून आतमध्ये जाते आणि आपल्या डोक्यात निर्माण होणारा घाम कमी करते. त्यामुळे आपले डोकेही थोडे शांत राहते. जेणेकरून आपण दुचाकी चालवताना शांतपणे दुचाकी चालू शकतो. विशेष म्हणजे, एखाद्या अपघातामध्ये दुचाकीचालक हा हेल्मेटमुळे वाचला असेल तर ते हेल्मेट परत वापरू नका. हेल्मेट जरी चांगले दिसत असले तरी मात्र त्या हेल्मेटला आतमधून आणि त्याच्या फिटिंगला इजा झालेली असते. त्यामुळे असे हेल्मेट सेवानिवृत्त करून त्यांच्या जागी आयएसआय मार्कचेच चांगल्या कंपनीचे हेल्मेट वापरावे, असेही हेल्मेट विक्रेता तथा तज्ञ हेमंत गुप्ता यांनी सांगितले.

Last Updated : Jul 24, 2020, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.