ETV Bharat / state

अकोला : 'या' गावात आजपर्यंत नाही एकही कोरोनाग्रस्त - अकोला विशेष बातमी

अकोल्यातील बहीरखेड गावात आजपर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही. ग्रामस्थांनी गेल्या वर्षभरापासून कोरोनाला 'गो कोरोना गो' म्हणत कोरोनाला वेशिवरच थांबवला आहे.

चित्र
चित्र
author img

By

Published : Jun 1, 2021, 7:45 PM IST

अकोला - सध्या जगभरात कहर करणारा कोरोना एका गावात अद्यापही पोहोचू शकला नाही. असे म्हटले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, अकोल्यातील बहीरखेड गावात आजपर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही. ग्रामस्थांनी गेल्या वर्षभरापासून कोरोनाला 'गो कोरोना गो' म्हणत कोरोनाला वेशिवरच थांबवला आहे.

बहीरखेड

जेमतेम साडेचारशे लोकवस्ती असलेल्या

अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील बहीरखेड गावाने कोरोना महामारीला वेशीवर रोखण्यात यश मिळविले आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून, ग्रामस्थांच्या एकजुटीने कोरोनाला गावात प्रवेशच करूच दिला नाही. नियमांचे पालन करून ग्रामस्थांनी गावाला कोरोनापासून दूर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या वर्षभरापासून गावात कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नाही.

असे केले उपाय

गेल्या वर्षभरापूर्वी कोरोनाने विदर्भात एन्ट्री केली. तेव्हापासून हे गाव फार सतर्क झाले. बहीरखेड गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेविका आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन सुरुवातीला गावबंदी केली. रस्ते, वाहतूक बंद केले. त्यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून सॅनिटायझरची फवारणी केली. गावातील लोकांना बाहेरगावी जाऊ न देणे, बाहेरगावच्या पाहुण्यांना गावात येऊ न देणे, बहीरखेड व आसपासच्या गावात लाऊड स्पीकर लावून जनजागृती करणे, गावातील वयोवृद्ध लोकांच्या बैठकावर बंदी, गावात फिजिकल डिस्टन्सिंग, घरा-घरामध्ये सॅनिटायझरचा वापर आदी नियम पाळल्यामुळे बहीरखेड गावात कोरोना नावाचा राक्षस प्रवेश करू शकला नाही.

ग्रामस्थांची एकजुट आणि निर्णयात्मक क्षमता असल्यामुळे कोरोना बहीरखेड गावात प्रवेश करू शकला नाही. बहीरखेड प्रमाणे प्रत्येक गाव आणि शहरांनी सतर्कता बाळगत नियमांचे पालन केले, तर संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही.

हेही वाचा - अकोट फाईलमध्ये दोन गोदामांना आग; लाखो रुपयांचे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.