अकोला - अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये काही उमेदवारांनी शिक्षकांना आमिष दिले. शिक्षक संघटनेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे स्वतंत्र असणाऱ्या शिक्षक संघटनेच्या निवडणुकीला राजकीय रंग प्राप्त झाला आहे. याबाबत डॉ. आनंद काळे, संजय खडतकार, देवेंद्र गावंडे, प्रदीप थोरात या शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया इटीव्ही भारतशी व्यक्त केला.
निवडणुकीला राजकीय रंग प्राप्त झाल्यामुळे शिक्षकांची प्रतिमा बदनाम-
अमरावती शिक्षक मतदारसंघांमध्ये 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 36 हजार मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परंतु, या निवडणुकीला आमिष आणि राजकीय रंग प्राप्त झाल्यामुळे शिक्षकांची प्रतिमा बदनाम झाली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे उपदेश देणारे शिक्षक या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराला समर्थन करीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
शिक्षकांसाठी धोक्याची घंटा -
अनेक उमेदवारांनी पैठणी, बॅग, रोख रक्कम अशा स्वरूपात मतदारांना आपल्याकडे ओढले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेबाबत काही शिक्षकांनी विरोध दर्शविला आहे. शिक्षक मतदार आमिषाला बळी पडत आहेत. तसेच शिक्षकाला राजकीय वळण मिळत आहे. हे भविष्यामध्ये शिक्षकांसाठी धोक्याची घंटा असल्याची प्रतिक्रिया काही शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन
हेही वाचा- महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा भाजपाचा कुटील डाव - सचिन सावंत