अकोला: नाना पटोलेंनी जुने शहरातील हरिहर पेठ येथे दंगलीमध्ये मृत पावलेले विलास गायकवाड यांच्या घरी भेट दिली. तसेच गुलाम नगर येथे शॉर्ट सर्किटमुळे मृत झालेल्या महिलेच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी मुस्लिम समाजातील महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असताना महिलांनी त्यांना घेराव घातला.
पटोलेंकडून नागरिकांची विचारपूस: अकोला शहरातील जुने शहर परिसरात 13 मे च्या रात्री उसळलेल्या जातीय तणावामध्ये मृत झालेल्या विलास गायकवाड यांच्या निवासस्थानी नाना पटोले यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी संपूर्ण कुटुंबाची विचारपूस केली. त्यानंतर नाना पटोलेंनी गुलाम नगर येथे शॉर्ट सक्रिटमुळे मृत्यू झालेल्या जुगणा बी शेख जावेद यांच्या मुलाशी संवाद साधला. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढाच मृतक महिलेच्या मुलाने व सुनेने वाचला. त्यांचे सांत्वन केल्यानंतर नाना पटोले हे पुढे जात असताना उपस्थित महिलांनी त्यांच्यासमोर आपबिती सांगितली.
महिलांचा पटोलेंना घेराव: नाना पटोले नागरिकांशी बोलत असताना शेकडो महिलांनी त्यांना घेराव घातला. यावेळी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाना पटोलेंनी तेथून काढता पाय घेतला. भेटीदरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व शहर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, अकोला निरीक्षक यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याचे काम : राज्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याचे काम सुरू झाले असल्याचा अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज नागपुरात बोलत होते. अकोला दंगल प्रकरणी मला जी माहिती प्राप्त झाली आहे, ती माहिती किती खरी आणि खोटी हे जाणून घेण्यासाठी मी आज अकोला येथे जात असल्याचे नाना पटोलेंनी सांगितले आहे.
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा: संजय राऊत ह्यांच्या हक्कभंगावर जी प्रोसेस असेल, ती होईल. संवैधनिक व्यवस्थेचा कसा वापर केला जातोय, हे आपण पाहत आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? असे चित्र तयार केले जात आहे. महाराष्ट्रात काय चालले आहे? अकोला प्रकरणात जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. उध्दव ठाकरे गटाने बैठकीत लोकसभेच्या 20 जागा मागितलेल्या नाहीत. मेरिटच्या आधारे निर्णय घेतला जाईल. त्यासाठी 3-3 लोकांची समिती केली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका त्या-त्या स्थितीनुसार स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
हेही वाचा: