ETV Bharat / state

मूर्तिजापूरजवळ शिवशाही आणि ट्रकचा अपघात, ४० ते ५० प्रवासी जखमी - अकोला

धडकेत ट्रक पलटी झाला. तर शिवशाहीच्या समोरचा भाग पूर्णपणे क्षतीग्रस्त झाला. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

शिवशाही बस आणि ट्रक अपघात
author img

By

Published : Apr 22, 2019, 10:42 AM IST

अकोला - मूर्तिजापूर रोडवरील नवसाळा फाट्यावर शिवशाही आणि ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातात शिवशाही मधील ४० ते ५० प्रवासी जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर आज (सोमवार) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

शिवशाही बस आणि ट्रक अपघात

नागपूरकडे जाणारी नाशिक-नागपूर शिवशाही बस मुर्तीजापूर नरसाळा फाट्याजवळ येताच समोरून अकोल्याकडे येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रक पलटी झाला. तर शिवशाहीच्या समोरचा भाग पूर्णपणे क्षतीग्रस्त झाला. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येवून वाहतूक सुरळीत केली.

जखमींना उपचारासाठी अमरावती येथे पाठवण्यात आले. तर, काही किरकोळ जखमींना मुर्तीजापुर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. यामध्ये जखमींचा मृत्यू झाल्याची अद्याप कुठलीही माहिती नाही.

Intro: अकोला - मूर्तिजापूर रोडवरील नवसाळा फाट्यावर शिवशाही व ट्रकचा अपघात झाला. या अपघातात शिवशाही मधील 40 ते 50 प्रवासी जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान घडली. जखमींना अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.Body:नागपूरकडे जाणारी नाशिक नागपूर शिवशाही बस मुर्तीजापुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नरसाळा फाट्याजवळ येताच समोरून अकोल्याकडे येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रक पलटी झाला. तर शिवशाहीच्या समोरचा भाग पूर्णपणे क्षतीग्रस्त झाला. या अपघातात बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. माना पोलीस त्यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. जखमींना उपचारासाठी अमरावती येथे पाठविले. काही किरकोळ जखमी यांना मुर्तीजापुर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये जखमींचा मृत्यू झाल्याची अद्याप कुठलीही माहिती नाही.
Conclusion:सोबत व्हिडीओ आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.