अकोला - परीक्षा म्हटली की कुटुंबातील सर्वच सदस्यांना एक टेन्शन येते. मुलाचा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे किंवा नाही याची काळजी सर्वांनाच असते. एखाद्या विद्यार्थ्याच्या परीक्षा काळामध्ये घरात आरोग्य संकट ( health crisis ) निर्माण झाले तर तो अभ्यासातून पूर्णपणे विचलित होतो. अशा विचलित परिस्थितीमध्येही यश गाठणाऱ्यांची संख्या ही बोटावर मोजण्याइतकीच असते. अशाच परिस्थितीमध्ये शंतनू साबळे ( Shantanu Sable ) यांनी बारावीच्या सीबीएससीच्या परीक्षेत ( CBSE 12th Exam ) 87 टक्के गुण घेऊन घरातील दुःखात असलेल्या सदस्यांना एक आनंदाचा झटका दिला आहे.
बिकट परिस्थीतीत अभ्यास - शंतनू धनंजय साबळे हा लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार आहे. अभ्यास एके अभ्यास असा त्याचा नित्यक्रम असतो. शिक्षणामध्ये भरारी घेत असतानाच तो बारावीच्या सीबीएससी परीक्षेची तयारी करीत होता. परीक्षेचा काळ सुरू होत नाही तोच त्याच्या आईचा अपघात झाला ( Mothers Accident ) होतो. तिच्यावर उपचार सुरू असतात. घरातील सर्वच कुटुंब आईच्या देखरेखीसाठी कष्ट करीत होते. त्यामध्ये शंतूनही परीक्षेचे ओझे सोडून आईच्या सेवेत लागला होता. त्यासोबतच घरात असलेल्या दुकानाकडेही तो लक्ष देत होता. अशा बिकट परिस्थितीमध्ये शंतनू आपल्या बारावीचा सीबीएससीच्या परीक्षेची तयारीही मिळेल त्या वेळी करीत होता. परंतू, या संकटामध्ये त्याला हवे असलेले यश मिळू शकणार नाही याची जाणीव असतानाही खंबीरपणे उभा राहून त्याने आपल्यावर आलेली जबाबदारी सांभाळीत अभ्यास केला.
आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू - घरातील सर्व सदस्यांना सांभाळून घेऊन त्यांनी बारावीची परीक्षा कशीबशी दिली. मनासारखे यश मिळेल अशी अपेक्षा न ठेवता उत्तीर्ण होऊ एवढीच मात्र त्याला आशा होती. परंतु आज लागलेल्या बारावीच्या सीबीएसीचा निकाल पाहून तो अचंबित झाला. सोबतच घरातील इतरही सदस्यांना त्याने अचंबित केले. घरात असलेले आरोग्याचे संकट याला सारून शंतनूने मिळविलेले यश हे आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रु आणणारे ठरले. या बिकट परिस्थितीमध्ये शंतनुने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.