ETV Bharat / state

सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग, ठेकेदाराला रस्ता दुरुस्तीचे आदेश

ईटीव्ही भारतने अकोला शहरातील किल्ला चौक ते बायपास या राज्य महामार्गावरील डांबरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल बांधकाम विभागाने घेऊन तो रस्ता चांगला करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारला दिले आहेत.

Road
author img

By

Published : Feb 22, 2019, 1:44 PM IST

अकोला - शहरातील किल्ला चौक ते बायपास या राज्य महामार्गावरील डांबरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रकाशित केले होते. यानंतर या बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाची चौकशी करू असे सांगितले. तसेच रस्ता चांगला करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले.

डांबरीकरणाचे काम सुरू असलेला रोड

ठेकेदाराच्या या मनमानी कारभाराविरोधात ईटीव्ही भारतने ९ फेब्रुवारीला वृत्त प्रकाशित केले. या बातमीची दखल बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धिवरे यांनी घेतली. त्यांनी तातडीने संबंधित कंत्राटदाराची कानउघडणी करत रस्त्याचा दर्जा चांगला ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार नागरिकांच्या तक्रारीनुसार कंत्राटदाराने काम करत या तक्रारी दूर केल्या. आता हा रस्ता योग्य पद्धतीने पूर्ण झाला आहे. हे काम चांगल्या पद्धतीने झाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले आहेत. दरम्यान, या संदर्भात कार्यकारी अभियंता धिवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

Intro:अकोला - जुने शहरातील किल्ला चौक ते बायपास या राज्य महामार्गावरील डांबरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याचा तक्रारीची ईटीवी भारत चैनलने दखल घेतली. यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामासंदर्भात चौकशी करू हा रस्ता चांगला करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले. दरम्यान, डोळे मिटून दूध पिणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुकीचा प्रकार नागरिकांसमोर आल्यानंतर जागे झालेल्या लागला विभागाला आपल्या जबाबदारीची जाणीव झाली.

Body:किल्ला चौक ते बायपास या राज्य महामार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम नियमांना बांधून नसल्याचे नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात आवाज उठवला. संबंधित ठेकेदार आपला फायदा पाहून या रस्त्याच्या कडेच्या दोन्ही बाजूनी दोन तीन फूट डांबरीकरण सोडून रस्ता तयार करीत असल्याचे निदर्शनास आले. या रस्त्याचे काम करताना निविदेनुसार आणि ऑर्डरनुसार होत नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच या रस्त्याचे काम सुरू करण्याआधी कशाप्रकारे आहे. त्या संदर्भातील कुठलाच सूचनाफलक संबंधित कंत्राटदाराने काम करण्याच्या ठिकाणी लावलेला नव्हता. त्यामुळे ठेकेदाराच्या काम करण्याच्या पद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. परिणामी, या रस्त्याचा दर्जा चांगला व्हावा, यासाठी नागरिकांनी आवाज उठवला. या संदर्भात भारत चैनल नऊ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धिवरे यांनी घेतली. त्यांनी तातडीने संबंधित कंत्राटदाराची कानउघडणी करीत रस्त्याचा दर्जा चांगला ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार नागरिकांच्या असलेल्या तक्रारी नुसार कंत्राटदाराने काम करीत या तक्रारी दूर केल्या. आता हा रस्ता योग्य पद्धतीने पूर्ण झाला असून हे काम चांगल्या पद्धतीने झाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले आहेत. दरम्यान, या संदर्भात कार्यकारी अभियंता धिवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

Conclusion:सूचना - 1) या बातमीत impact चा लोगो वापरता येत असेल तर वापरावा
2) नागरिकाचा बाईट व व्हिडीओ पाठवीत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.