ETV Bharat / state

कैदी बनले कांदा उत्पादक शेतकरी; २२ एकरात फुलवला मळा - कैदी

शेतीत एक नवा आदर्श निर्माण करण्याचे काम अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी केले आहे. वर्षभरासाठी लागणाऱया भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन हे कैदी कमाई करीत आहेत. त्याचबरोबर कैदी असतानाही शेतकरी असल्याचा अनुभव हे कैदी घेत आहेत.

केैदी बनले कांदा उत्पादक शेतकरी
author img

By

Published : Mar 4, 2019, 9:36 PM IST

अकोला - शेती फक्त शेतकऱ्यांनीच करावी असा नियम नाही. आता खासगी व शासकीय नोकरदारही शेतीकडे वळत आहेत. याच्या पलीकडे जाऊन बंदिस्त दुनियेतील कैदीही शेती करीत आहेत. अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैदी अनेक वर्षांपासून शेती करीत आहेत. यावर्षी हे बंदिवान शेतकरी कांदा उत्पादक ठरणार आहेत. कारागृहाच्या २२ एकर जागेमध्ये त्यांनी इतर भाजीपाल्यासह १० ते १२ एकरावर कांद्याची लागवड केली आहे.

केैदी बनले कांदा उत्पादक शेतकरी

शेतीत एक नवा आदर्श निर्माण करण्याचे काम अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी केले आहे. वर्षभरासाठी लागणाऱया भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन हे कैदी कमाई करीत आहेत. त्याचबरोबर कैदी असतानाही शेतकरी असल्याचा अनुभव हे कैदी घेत आहेत. या बंदिवान शेतकऱ्यांनी कारागृहातील २२ एकर जागेवर वांगे, टमाटर, पालक, बिट यासह कांदा हे मोठ्या प्रमाणात घेतले आहे. यामुळे बंदीवानांसाठी कारागृह प्रशासनाला बाजारातून भाजीपाला आणण्याचा खर्च वाचला आहे.

ही शेती करण्यासाठी सकाळी साडेआठ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत बंदिवान शेतात राबतात. त्यांच्या श्रमाचे फळ म्हणजे कारागृहाच्या २२ एकर शेतात बहरलेला कांदा आहे. पाण्याचा मुबलक साठा असल्याने बंदिवान शेतकरी शेती करू शकत आहेत. या कांद्याच्या उत्पादनाने कारागृह प्रशासनाचा कांद्याचा प्रश्न मिटला आहे. यासोबतच गरजेपेक्षा जास्त झालेला कांदा हा इतर वाशीम आणि बुलडाणा येथील कारागृहात पाठविण्यात येणार असल्याची माहिती कारागृह प्रभारी अधीक्षक दयानंद सोरटे यांनी दिली. त्यामुळे बंदीवानाच्या सहकार्यने होणाऱ्या या शेतीने शेतकऱ्यांना ही मागे टाकले आहे.

Intro:अकोला - शेती ही फक्त शेतकऱ्यांनीच करावी असा नियम नाही. आता खासगी व शासकीय नोकरदारही शेतीकडे वळत आहे. यांच्या पलीकडे जाऊन बंदिस्त दुनियेतील बंदिवान ही शेती करीत आहेत. अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गेल्या अनेक वर्षांपासून शेती करीत आहेत. यावर्षी हे बंदिवान शेतकरी कांदा उत्पादक ठरणार आहेत. कारागृहाच्या 22 एकर जागेमध्ये त्यांनी इतर भाजीसह दहा ते बारा एकरावर कांदा उत्पादन करीत आहे.

Body:देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी घाम गाळून एकप्रकारे जुगारच खेळत आहे. त्याच्या मालाला भाव मिळत नसल्याने तो खचलेला आहे. तरीही कर्ज काढून तो परत शेती करतो. त्याचा मालालाचा मलिदा दलाल आणि व्यापारी खाऊन टाकतात. आशा अवस्थेत जगणाऱ्या शेतकऱ्याला सरकार कडून नेहमीच उमेद आहे. शेतीतही नवनवीन प्रयोग करून पारंपरिक पद्धतीला फाटा देत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांचे जीवनमान उचवीत आहे.
याउपर शेतीत एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्यांमध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवान ठरत आहे. वर्षभरासाठी लागणारा भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन आपला खर्च वाचवून कमाई करीत आहे. त्यासोबत बंदिवान असतानाही शेतकरी असल्याचा अनुभव घेत आहे. या बंदिवान शेतकऱ्यानि कारागृहातील 22 एकर जागेवर वांगे, टमाटर, पालक, बिट यासह कांदा हे मोठ्या प्रमाणात घेतले आहे. यामुळे बंदीवाणांसाठी कारागृह प्रशासनाला बाजारातून भाजीपाला आणण्याचा खर्च वाचला आहे. ही शेती करण्यासाठी सकाळी साडेआठ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत बंदिवान शेतात राबतात. त्यांच्या श्रमाचे फळ म्हणजे कारागृहाच्या 22 एकर शेतात बहरलेला कांदा. पाण्याचा मुबलक साठा असल्याने बंदिवान शेतकरी ही शेती करू शकत आहेत. या कांद्याच्या उत्पादनाने कारागृह प्रशासनाचा कांद्याचा प्रश्न मिटला आहे. यासोबतच गरजेपेक्षा जास्त झालेला कांदा हा इतर वाशीम आणि बुलडाणा येथील कारागृहात पाठविण्यात येणार असल्याची माहिती कारागृह प्रभारी अधीक्षक दयानंद सोरटे यांनी दिली. त्यामुळे बंदीवानाच्या सहकार्यने होणाऱ्या या शेतीने शेतकऱ्यांना ही मागे टाकले आहे.

Conclusion:सूचना - अकोला येथून पाठविलेली ही बातमी पॅकेज करून पाठविली आहे. कृपया ती वापरावी, ही विनंती.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.