अकोला - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची चिखलगाव येथे सम्यक जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी आहे. या फॅक्टरी ला मंगळवारी सकाळी आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. ही आग नेमकी लागली कशामुळे हे अद्याप कळू शकले नाही. आग लागल्यानंतर काम करणारे मजूर पळून गेल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाने प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली.
प्रकाश आंबेडकर यांच्या जिनिंग फॅक्टरीला आग; कोट्यवधींचा कापूस जळून खाक - अकोला लेटेस्ट न्युज
अकोला पातूर रोडवरील चिखलगाव येथील सम्यक जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग लागली. या फॅक्टरीमध्ये 48 स्पिन मशीनवर काम सुरू होते. कापूस वाहक पट्ट्यावर घर्षण होऊन ठिणगी उडाल्याने आग लागली असावी, असा अंदाज व्यवस्थापक भारती इंगळे तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी व्यक्त केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या जिनिंग फॅक्टरीला आग; कोट्यवधींचा कापूस जळून खाक
अकोला - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची चिखलगाव येथे सम्यक जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी आहे. या फॅक्टरी ला मंगळवारी सकाळी आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. ही आग नेमकी लागली कशामुळे हे अद्याप कळू शकले नाही. आग लागल्यानंतर काम करणारे मजूर पळून गेल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाने प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली.
Last Updated : May 26, 2020, 10:13 PM IST