ETV Bharat / state

Miniature best bus : मिनिएचर आर्ट जोपासणाऱ्या अकोल्याच्या पियुषने साकारली हुबेहूब 'लालपरी'

अकोल्याच्या पियुष राऊतने कोणतेही शिक्षण न घेता मिनिएचर कला जोपासत आहे. त्याने फोमच्या शीटचा वापर करून बेस्टच्या बसची ( Miniature best bus ) प्रतिकृती बनवली आहे.

Miniature best bus
Miniature best bus
author img

By

Published : Apr 19, 2022, 6:10 PM IST

Updated : Apr 19, 2022, 6:46 PM IST

अकोला - लालपरीचा गौरवशाली परंपरेला आपल्या कलाकृतीतून साकारण्याचा प्रयत्न अकोल्यातील पियुष राजेंद्र राऊत या युवकाने केला आहे. मिनिएचर आर्टचा छंद लागलेल्या पियूषने लालपरी बनविण्याचा गुण जोपासला. एसटी बसमध्ये बसण्यास अनेकांना आवडत नाही. परंतु, अकोल्याच्या पियूषने या बसमध्ये आपली आवड निर्माण केली. विशेष म्हणजे, त्याला यामधून रोजगार ही मिळत आहे.

पियुष राऊतने साकारली बस

साधी आणि रिमोटची बस तो बनवत असून, त्याची ही कलाकृती सातासमुद्रपार गेली आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून त्याच्याकडे बसची मागणी होत आहे. याचबरोबर तो बसच्या डिझाईनसाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सल्ले देतो.

अशी लागली बस तयार करण्याची आवड

एसटी बस असच काहीसं आकर्षण पियुषला युवकाला लहानपणापासूनच आहे. मेंडशी ते मालेगाव असा प्रवास त्याने 7 ते 8 वर्ष दररोज केला. त्यामधून त्याने महामंडळाच्या बसेस बनविण्याचा संकल्प केला. अत्यंत परिश्रम आणि मेहनतीने त्याने पहिली बस बनवली. ही बस बनवण्यासाठी त्याला जवळपास 30 दिवस लागले. आता याच बसेस तो 8 ते 10 दिवसात बनवतो.

Miniature best bus
लालपरी

फोम शीटपासून बस
बसचे सर्व साहित्य तो फोम शिटपासून बनवितो. लहानसहान बाबीकडे तो लक्ष ठेवतो. हुबेहूब बस बनविण्यासाठी तो दररोज 7 ते 8 तास देतो. या बसेसमध्ये अधिक चांगले काम व्हावे म्हणून तो महागड्या वस्तू यासाठी वापरतो. प्रत्यक्ष बसमधील अगदी लहान-लहान सोयी-सुविधा, स्पेअर पार्टचा विचार करून बसच्या प्रतिकृतीची बांधणी केली आहे. एसटीच्या गाड्यांची सजावट करणे, गाडीला लूक देणे, नाव देणे, तिचे आकर्षण वाढविणे हा मुख्य उद्देश समोर ठेवून तो काम करीत आहे. नवीन बसची डिझाइन तयार करण्याचे काम ही तो करतो आहे. त्यासाठी तो विविध आगाराना भेट देतो.

हेही वाचा - Narasimhananda on Hindu Child Birth : इस्लामिक राष्ट्र होणे टाळण्याकरिता हिंदुंनी जास्ती जास्त मुलांना जन्माला घालायला हवे- महंत यती नरसिंहानंद

शिवशाही बनवण्याचे स्वप्न
पियुष राउतने आतापर्यंत 40 बसेस बनविल्या आहे. 3x2 पासून ते लाल, पिवळी, हिरकणी, जांभळी हिरकणी, विठाई, माऊली, एसियार्ड बनविल्या बसेस त्याने बनविल्या आहेत. शिवशाही बनविण्याचे त्याचे राहिले आहे. एक बस तो 3 हजार रुपयात विकतो. काही बसेस त्याने रिमोटवर केल्या. तर काही बसेस त्याने शोपीस म्हणून केल्या.

Miniature best bus
पियुषची करामत

कल्पनेतून कला साध्य
मिनिएचर (बसेस बनविणारे) राज्यात एक किंवा दोन जण असतील. केरळमध्ये भरपूर जण मिनिएचर वर काम करतात. चित्रकला, क्राफ्टचा कुठलाही गंध त्याला नाही. तरीही तो स्वतःच्या कल्पनेतून त्याने ही कला साध्य केली आहे. स्वतःच बस बनिविण्यापासून तर त्याला रंग देण्याचे काम तो स्वतःच करतो. गोव्याच्या बसेसची ऑर्डर त्याला मिळाली आहे. एसटी प्रेमी ग्रुपचा तो सदस्य आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील नागरिक या ग्रुपमध्ये सहभागी आहेत. लोकांपर्यंत एसटीची माहिती पोहोचविणे, जनजागृती करणे, महत्व पटवून देणे हे ग्रुपचे काम आहे, असे पियुष राऊत सांगतो.

Miniature best bus
मिनिएचर आर्ट

अशी आहे पियुषची लालपरी

दोन फूट लांबीच्या बसमध्ये प्रवाशांसाठी बसण्याची सीट, प्रत्येक खिडकीला काच, उभे असलेल्या प्रवाशांना पकडण्यासाठी दांडा, गिअर बॉक्स, बेरिंग, दोन्ही बाजूचे आरसे, उघडणारा व बंद होणारा दरवाजा, बसवर माहिती फलक, क्रमांक, आगार नाव आदी बाबी हुबेहूब साकारण्यात आले आहेत. बसची चाके फिरणारी आहेत. त्यासाठी बेरिंगचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ही बस धावते देखील. खर्‍याखुर्‍या बस सारखी रंगरंगोटी केलेल्या प्रतिकृती लक्षवेधी ठरत आहेत.

हेही वाचा - Manoj Pandey : नागपूरकर मनोज पांडे लष्करप्रमुख झाल्याचा आनंद.. बालपणीच्या मित्राने दिला आठवणींना उजाळा

Last Updated : Apr 19, 2022, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.