अकोला - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज (सोमवारी) सकाळी आलेल्या अहवालामध्ये 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर 10 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 2 जण घरी गेले आणि 8 जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे.
सायंकाळी आलेल्या एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही. उपचार घेणाऱ्या एका 55 वर्षीय महिलेचा दुपारी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 34 वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण 441 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ही 605 वर पोहोचली आहे.
अकोल्यातील रुग्ण सापडण्याची संख्या ही दोन अंकी आकड्यांमध्ये असल्यामुळे रुग्णांचे जूनपर्यंत ही संख्या 10 हजारांच्या जवळ जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज (रविवारी) मृत झालेली महिला फिरदौस कॉलनी येथील रहिवासी होती. ती 29 मे रोजी दाखल झाली होती.
प्राप्त अहवाल - 107
पॉझिटीव्ह - 24
निगेटीव्ह - 83
आताची सद्यस्थिती -
*एकूण कोरोनाबाधितांची संख्या - 605
*मृत - 34
*एकूण बरे झालेले - 441
*ॲक्टिव्ह रुग्ण - 129