ETV Bharat / state

दिवसभरातील सर्व अहवाल निगेटिव्ह; अकोल्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल - akola corona news

संपूर्ण जिल्ह्यात आज एकाही कोरोनाबाधित आढळला नाही. आज प्राप्त झालेल्या २१ अहवालांपैकी सर्व निगेटिव्ह आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

corona in akola
संपूर्ण जिल्ह्यात आज एकाही कोरोनाबाधित आढळला नाही.
author img

By

Published : Apr 20, 2020, 7:28 PM IST

अकोला - संपूर्ण जिल्ह्यात आज एकाही कोरोनाबाधित आढळला नाही. आज प्राप्त झालेल्या २१ अहवालांपैकी सर्व निगेटिव्ह आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. दिवसाअखेर एकूण ४१४ अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी ३९८ निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे.

corona in akola
संपूर्ण जिल्ह्यात आज एकाही कोरोनाबाधित आढळला नाही.

आजपर्यंत एकूण ४१९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३३५, फेरतपासणीचे ६० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २४ नमुने होते. आज २१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील सर्व निगेटिव्ह आले आहेत. आजपर्यंत एकूण ४१४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील प्राथमिक तपासणीचे ३३० तर फेरतपासणीचे ६० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २४ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३९८ आहे.

दिवसाअखेर जिल्ह्यातील पाच जणांचे अहवाल प्रलंबित असून ते सर्व प्राथमिक स्वरुपाचे आहेत. सद्यस्थितीत ४८ रुग्ण भरती आहेत. जिल्ह्यात आज अखेर ४८४ जण बाहेरुन आलेल्यांची संख्या आहे. त्यापैकी १७५ जण होम क्वारंटाईन आहेत. तर ११२ जण संस्थागत अलगीकरणात आहेत. एकूण २८७ जण आयसोलेशनमध्ये आहेत. १५५ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे. तर विलगीकरणात आता ४१ जण दाखल झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.