अकोला - राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शुक्रवारी सायंकाळी गांधी चौकामध्ये रास्तारोको करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा काढल्याचा यावेळी निषेध करण्यात आला.
हेही वाचा - 'शरद पवारांची काळजी घेणे आपलं काम'; बाळासाहेब थोरातांची नाराजी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली. शाहंच्या निर्णयाविरोधात यावेळी रोष व्यक्त करण्यात आला. या रास्ता रोकोदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सिटी कोतवाली पोलिसांचा बंदोबस्त होता.
हेही वाचा - शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा हटवली, राष्ट्रवादी आक्रमक