अकोला - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार ही भ्रष्टाचारी सरकार होती. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्याने भ्रष्ट सरकारला आपण हद्दपार करण्यात यशस्वी झालो आहोत. आपण महायुतीला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(बुधवारी) आपल्या भाषणातून केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगनावावर भाजप व शिवसेना युतीच्या उमेदवारांसाठी जाहीर प्रचार सभेच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोदी बोलत होते. पुढे ते म्हणाले, या जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग लवकर पूर्ण करून येथे फूड प्रोसेसिंग प्लांट आणि विविध उद्योग उभारून येथील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारने राज्यातील नागरिकांचा आणि राज्याचा विकासाचा संकल्प केला आहे.
हेही वाचा - इकडं मान वाकव, तिकडं मान वाकव... स्वाभीमान कसला ही तर लाचारी - उद्धव ठाकरे
यावेळी मोदींनी मोरणा नदी स्वच्छता अभियान, सोनखत अभियान सारखे अभियान राबविल्याने मी अकोल्याचे नाव मन की बात मध्ये मी चारवेळा घेतले आहे, असे सांगितले. तसेच अकोल्याचा विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे, असेही आश्वासन त्यांनी शेवटी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करून अकोलेकरांना अचंबित केले. तसेच तुकडोजी महाराजांच्या चार ओळी म्हणत त्यांनी राज्याचा आणि देशात विकास साधून एकत्र राहण्याचे आव्हान केले.
हेही वाचा - भारतरत्न सावरकरांनाच का? गोडसेलाही द्या - मनीष तिवारी
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह भाजपचे व शिवसेनेचे उमेदवार मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.